IMPIMP

Praveen Kumar Death News | महाभारतातील ‘भीम’चे निधन, अमिताभ-जितेंद्र यांच्यासोबत सुद्धा केले होते काम

by nagesh
Praveen Kumar Death News | praveen kumar death news bhim of mahabharata died at the age of 74 was troubled by financial constraints

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPraveen Kumar Death News | लता मंगेशकर यांच्या निधनानंतर (Lata Mangeshkar Passes Away) मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. महाभारत मालिकेत (Mahabharat) भीमाची भूमिका साकारणारे प्रवीण कुमार यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन (Praveen Kumar Death News) झाले आहे. ते अनेक दिवसांपासून आजार आणि आर्थिक विवंचनेशी झुंज देत होते. त्यांनी आपल्या उंच आणि मजबूत शरीराच्या जोरावर खेळाडू म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर हिंदी चित्रपटांकडे वळले.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रवीण कुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या, पण त्यांना प्रसिद्धी महाभारत मालिकेतून मिळाली, ज्यात त्यांनी भीमाची भूमिका केली होती. फार कमी लोकांना माहित असेल की प्रवीण कुमार यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जितेंद्र (Jitendra) यांसारख्या सुपरस्टार्ससोबतही काम केले होते. (Praveen Kumar Death News)

 

प्रवीण कुमार (Praveen Kumar) यांचा 1981 मध्ये आलेला ’रक्षा’ हा पहिला चित्रपट होता.
त्याच वर्षी ‘मेरी आवाज सुनो’ हा त्यांचा दुसरा चित्रपटही आला.
या दोन्ही चित्रपटात जितेंद्र त्यांच्यासोबत होते.
त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या ’शहेनशाह’ या सुपरहिट चित्रपटातही काम केले आहे.
प्रवीण यांनी चाचा चौधरी या मालिकेतही साबूची भूमिका साकारली होती.

 

 

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रवीण कुमार डिस्क थ्रो अ‍ॅथलीट होते.
ते चार वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत (2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य) पदक विजेता होते आणि त्यांनी दोन ऑलिम्पिकमध्ये (1968 मेक्सिको गेम्स आणि 1972 म्युनिक गेम्स) भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
ते अर्जुन पुरस्कार विजेता देखील आहेत.
खेळामुळे प्रवीण यांना सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) डेप्युटी कमांडंटची नोकरी मिळाली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ट्रॅक आणि फील्ड स्पोर्ट्समध्ये यशस्वी कारकीर्द केल्यानंतर, प्रवीण कुमार यांनी 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात शोबिझमध्ये कारकीर्द सुरू केली.
एका मुलाखतीत, प्रवीण कुमार यांनी आठवण सांगितली होती की, काश्मीरमध्ये स्पर्धेसाठी असताना त्यांनी पहिला बॉलीवूड चित्रपट साईन केला होता.

 

प्रवीण कुमार यांचे लोकप्रिय चित्रपट
करिश्मा कुदरत का, युद्ध, जबरदस्त, सिंघासन, खुदगर्ज, लोहा, मोहब्बत के दुश्मन, इलाका.

 

Web Title :- Praveen Kumar Death News | praveen kumar death news bhim of mahabharata died at the age of 74 was troubled by financial constraints

 

हे देखील वाचा :

Aadhaar Not Mandatory For Covid Vaccination | कोरोना व्हॅक्सीनसाठी ‘आधार’ कार्ड अनिवार्य नाही, ‘या’ 9 कागदपत्रांपैकी कोणत्याही एकाचा करू शकता वापर; जाणून घ्या

Weight Loss | काजू खाल्ल्याने वजन वाढते का? जाणून घ्या सत्य

Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला प्रकरणात पुण्याच्या क्वॉर्टर गेट परिसरातून एकाला अटक

 

Related Posts