IMPIMP

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ ?

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission news central gov employees on da dearness allowance detail here

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन 7th Pay Commission | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Employees) एक खूशखबर देण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारीच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मार्च, एप्रिलमध्ये थकबाकीसह भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, सरकारच्या निर्णयानुसार जुलैमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (7th Pay Commission) महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केल्याची शक्यता असल्याने वाढत्या महागाईपासून दिलासा मिळाला आहे. मार्चमध्ये आलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (All India Consumer Price Index) वरून (AICPI) याबाबत सांगण्यात आलं आहे की, जुलै – ऑगस्टमध्ये महागाई भत्ता 4 टक्के दराने वाढू शकतो. असं म्हटलं आहे. दरम्यान, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये AICPI मध्ये झालेल्या घसरणीमुळे जुलै – ऑगस्ट साठी DA वाढण्याची शक्यता कमी होती. पण, आता मार्च महिना आल्याने आशा वाढल्या आहेत. जुलै – ऑगस्टमध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांवर राहिला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. (7th Pay Commission)

 

एआयसीपी इंडेक्सचा डेटा श्रम आणि रोजगार मंत्रालयाने (Ministry of Labor and Employment) जानेवारी आणि जुलैमध्ये जारी केला आहे.
या आधारे महागाई भत्ता वाढविला जातो आहे.
जानेवारी 2022 पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली.
सध्या त्यांचा एकूण महागाई भत्ता 34 टक्के आहे. आता जुलैचा महागाई भत्ता ऑगस्टमध्ये जाहीर केला जाऊ शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, जानेवारी आणि फेब्रुवारी 2022 साठी AICP निर्देशांकात घसरण झाली.
एआयसीपी निर्देशांक जानेवारीमध्ये 125.1 आणि फेब्रुवारीमध्ये 125 होता. मार्चमध्ये ते 1 अंकाने वाढून 126 वर पोहोचले.
आता एप्रिल – मे आणि जूनचे आकडे येणे बाकी आहे. जर हा आकडा 126 च्या वर गेला तर डीए वाढ 4 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission now once again in july dearness allowance of central employees may increase

 

हे देखील वाचा :

Climber Narayanan Iyer And Pradnya Sawant Dies | पुण्याचे गिर्यारोहक नारायणन अय्यर, मुंबईच्या ट्रेकर प्रज्ञा सावंत यांचा मृत्यु

Solapur Crime | सीना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तरुण डॉक्टराचा बुडून मृत्यू

Mumbai Crime | महिलेने पोटात लपवल्या ड्रग्जनं भरलेल्या तब्बल 20 कॅप्सूल, पोलिसही चक्रावले

 

Related Posts