IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ ! जाणून घ्या किती वाढणार पगार

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission government set to be pay due da arrears in july know

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | मोदी सरकार (Modi Government) लवकरच केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टर (fitment factor) मध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. केंद्र सरकारी कर्मचार्‍यांसाठी नरेंद्र मोदी सरकार येत्या काही दिवसांत आणखी काही आनंदाची बातमी आणू शकते. किमान वेतन 18,000 वरून 26,000 रुपये आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची (Salary Hike) मागणी केंद्र सरकारी कर्मचारी संघटना दीर्घकाळापासून करत आहेत. (7th Pay Commission)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरवर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. याचा अर्थ सरकारी कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते. निवडणुकीपूर्वी सरकार याबाबत मोठी घोषणा करू शकते, असे मानले जात आहे.

 

26 हजार रुपये होईल मूळ वेतन
केंद्र सरकारने फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचे वेतन आपोआप वाढेल. फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचे मूळ वेतन ठरवते. फिटमेंट फॅक्टर शेवटचा 2016 मध्ये वाढवण्यात आला होता, ज्यामध्ये कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 6,000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले होते. फिटमेंट फॅक्टरमध्ये संभाव्य वाढीमुळे 26,000 रुपये किमान मूळ वेतन मिळू शकते. (7th Pay Commission)

 

सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये असून ते 26,000 रुपये होणार आहे. म्हणजेच सरकारी कर्मचार्‍यांना मूळ वेतनात थेट 8000 रुपयांची वाढ मिळणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

वाढतील भत्ते
मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढल्यास, महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) ही वाढेल.
महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 31 टक्के इतका आहे. डीएची गणना डीएच्या दराला मूळ वेतनाने गुणाकार करून केली जाते.
म्हणजेच मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता आपोआप वाढेल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission salary hike modi government fitment factor consider central government employees salary will increase by 26000

 

हे देखील वाचा :

Dating APP Tinder | आता 30 ते 49 वयोगटातील व्यक्तींसाठी चार्ज कमी करणार टिंडर

LIC Kanyadaan Policy | ‘एलआयसी’च्या कन्यादान पॉलिसीत रोज जमा करा 130 रुपये, मॅच्युरिटीवर मिळतील 27 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या 2 सराईतांना गुन्हे शाखेकडून अटक, जबरी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस

Gangubai Kathiawadi | …म्हणून ‘गंगुबाई काठियावाडी’ला कुटुंबियांचाच विरोध; चित्रपटावर बंदी घालण्याची केली मागणी

 

Related Posts