IMPIMP

Pune Crime | नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या 2 सराईतांना गुन्हे शाखेकडून अटक, जबरी चोरीचे 4 गुन्हे उघडकीस

by nagesh
Pune Crime | Koregaon police arrested the maid who stole silver gods and ornaments

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | रस्त्याने पायी जाणाऱ्या एकट्या व्यक्तीला हेरुन त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरणाऱ्या (Mobile Thieves) रेकॉर्डवरील दोन चोरट्यांना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 5 (Pune Police Crime Branch) ने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 4 गुन्हे उघडकीस आले असून पोलीसांनी 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) कोंढवा येथील कपिलनगर (Kapil Nagar Kondhwa) येथील मोकळ्या जागेत बुधवारी (दि.9) केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

समीर उमर शहा Sameer Umar Shah (वय-25 रा. खोपडे नगर, गुजरवाडी रोड, कात्रज -Katraj मुळ रा. मु. पो. कोलापाटी, मानवत रोड, ता. जि. परभणी Parbhani), गणेश महादेव अवचारे उर्फ पाटील Ganesh Mahadev Avchare alias Patil (वय-27 रा. खोपडे नगर, कात्रज, मुळ रा. देवडीगाव ता. पुरंदर Purandar) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

 

गुन्हे शाखेचे पोलीस कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत असताना पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आणि पाहिजे असलेले दोन सराईत मोबाईल चोर कोंढवा येथील कपीलनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे चार मोबाईल हॅन्डसेट (Mobile Handset) मिळाले.
पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, पैशांची गरज असल्याने त्यांनी एकट्या व्यक्तीला हेरुन त्यांच्याकडील मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने चोरी केल्याची कबुली दिली.
कोंढवा पोलीस ठाण्यातील 3 तर सिंहगड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Police Station) 1 गुन्हा उघडकीस आला आहे.
तर कोंढवा, बिबवेवाडी (Bibwewadi police station) आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील (Marketyard Police Station) दाखल गुन्ह्यात आरोपी फरार असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil),
सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare),
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे (PSI Somnath Shendge)
अमंलदार रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, दया शेगर, आश्रुबा मोराळे,
अजय गायकवाड, महेश वाघमारे, दिपक लांडगे, प्रविण काळभोर, विशाल भिलारे, विनोद शिवले, अकबर शेख,
दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, विलास खंदारे, अमर उगले, दत्ता ठोंबरे, स्वाती गावडे, स्नेहल जाधव,
संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests 2 criminals for stealing citizens mobile phones 4 cases of robbery revealed

 

हे देखील वाचा :

Gangubai Kathiawadi | …म्हणून ‘गंगुबाई काठियावाडी’ला कुटुंबियांचाच विरोध; चित्रपटावर बंदी घालण्याची केली मागणी

Multibagger Penny Stock | 50 पैशांचा ‘हा’ शेयर 60 रुपयांवर पोहोचला, 1 लाखांचे केले रू. 1.20 कोटी, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

Ravi Rana | आमदार रवी राणांवर IPC 307 कलमान्वये FIR, राजकीय वाद चिघळला

 

Related Posts