IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळेल डबल बोनांझा ! सॅलरी वाढण्यासह होतील ‘या’ मोठ्या घोषणा; जाणून घ्या

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission government will hike da before dussehra see detail here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Government Employees) होळीपूर्वी (Holi Festival 2022) पुन्हा आनंदाची बातमी मिळू शकते. मोदी सरकार आपल्या कर्मचार्‍यांना भेट देण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होळीपूर्वी डीए वाढीसोबत HRA Hike ची घोषणाही केली जाऊ शकते. याआधी दिवाळीच्या दिवशी मोदी सरकारने कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (DA Hike) 3 टक्क्यांनी वाढ केली होती. (7th Pay Commission)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

आता केंद्र सरकार पुन्हा एकदा कर्मचार्‍यांना खूश करू शकते, अशी चर्चा आहे. सरकार डीएसोबत घरभाडे भत्ता (HRA) वाढविण्याचा विचार करत आहे.

 

34% डीए वाढ निश्चित
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या (Pensioners) दीर्घ प्रतीक्षेनंतर, महागाई भत्त्यात (Dearness allowance) 3% वाढ निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता (DA Hike) मिळेल. औद्योगिक कामगारांसाठी (AICPI Index) डिसेंबर 2021 च्या ग्राहक मूल्य निर्देशांकात एका अंकाची घट झाली आहे. (7th Pay Commission)

महागाई भत्त्यासाठी 12 महिन्यांच्या निर्देशांकाची सरासरी 351.33 झाली आहे ज्याची सरासरी 34.04% आहे. परंतु, महागाई भत्ता (Dearness allowance Hike) नेहमी पूर्णांकाने दिला जातो. म्हणजेच जानेवारी 2022 पासून एकूण महागाई भत्ता 34% असेल.

 

प्रस्ताव पाठवला
अर्थ मंत्रालयाने 11.56 लाखांहून अधिक कर्मचार्‍यांना घरभाडे भत्ता (HRA) लागू करण्यासाठी विचारमंथन सुरू केले आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कर्मचार्‍यांना एचआरए मिळेल.

इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर्स असोसिएशन आणि नॅशनल फेडरेशन ऑफ रेल्वेमेन 1 जानेवारी 2021 पासून HRA लागू करण्याची मागणी करत आहेत. घरभाडे भत्त्यात वाढ केल्यानंतर पगारात बंपर वाढ होणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किती होईल हाऊस रेंट अलाऊन्स ?
ज्या शहरांची लोकसंख्या 50 लाखांपेक्षा जास्त आहे ती ’X’ श्रेणीत येतात.
त्याचबरोबर ज्यांची लोकसंख्या 5 लाखांपेक्षा जास्त आहे ती ‘Y’ वर्गात येतात.
आणि 5 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरे ’Z’ श्रेणीत येतात.
तिन्ही श्रेणींसाठी किमान एचआरए 5400, 3600 आणि 1800 रुपये असेल.

डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरनुसार, जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल, तेव्हा कमाल House Rent Allowance 30 टक्क्यांपर्यंत वाढेल.
पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा डीए 50 टक्क्यांच्या पुढे असेल.
कारण सरकारच्या जुन्या आदेशानुसार, जर डीए 50 टक्केच्या पुढे गेला तर HRA 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्के होईल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission update govt increase central govt employee hra soon cpc latest news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने केलं संतापजनक कृत्य

Kirit Somaiya | किरीट सोमय्या आक्रमक, म्हणाले – ‘मला मारण्याचा कट होता, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना सोडणार नाही’

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 928 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Government Jobs in Maharashtra | 10 वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ! आजच करा याठिकाणी अप्लाय

 

Related Posts