IMPIMP

Kirit Somaiya | किरीट सोमय्या आक्रमक, म्हणाले – ‘मला मारण्याचा कट होता, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना सोडणार नाही’

by nagesh
Kirit Somaiya | shiv sena rebel mla sanjay gaikwad slam bjp leader kirit somaiya

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनभाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुण्यामध्ये हल्ला (Attack) झाला होता. यावरून आता किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांना इशारा दिला आहे. पुण्यात शिवसेनेच्या (Pune Shivsena) गुंडांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. यासाठी मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सोडणार नाही. शिवसेनेच्या गुंडांवर कठोर कलमांतर्गत कारवाई करायला लावेन असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या झटापटीत किरीट सोमय्या खाली पडले होते. त्यांना दुखापतही झाली होती. यापार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी सोमवारी मुंबईत (Mumbai) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर चांगलीच आगपाखड केली.

 

 

 

किरीट सोमय्या म्हणाले, पुण्याच्या शिवाजीनगर कोव्हिड सेंटरची (Shivaji Nagar Covid Center) मी पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर मी महापालिकेत तक्रार करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी महापालिकेत लपून बसलेल्या शिवसेनेच्या 100 गुंडांनी माझ्यावर लाठ्याकाठ्यांनी आणि दगड घेऊन प्राणघातक हल्ला केला. शिवसेनेचे गुंड माझ्या जीवावर उठले होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांनी बनावट कंपनीच्या (Fake Company) माध्यमातून शिवाजीनगर कोव्हिड सेंटरचे कंत्राट मिळवले होते. या सेंटरमध्ये तिघांचा मृत्यू झाला.

 

सोमय्या पुढे म्हणाले, कोव्हिड सेंटरच्या कंत्राटासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली होती.
त्यामुळे आता उद्धव ठाकरे अडचणीत येत असल्याचे पाहून मी महापालिकेत गेलो असता शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला.
यासाठी मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सोडणार नाही, असाही इशारा सोमय्या यांनी दिला.

 

याशिवाय किरीट सोमय्या यांनी पुण्यातील हल्ल्याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
यामध्ये एक शिवसैनिक भलामोठा दगड घेऊन सोमय्या यांच्या गाडीच्या मागे धावताना दिसत आहे.
या शिवसैनिकाने किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगड मारण्याचा प्रयत्नही केला.
परंतु किरीट सोमय्या यांची गाडी पुढे निघून गेल्याने मोठा अनर्थ टळला.

 

Web Title :- Kirit Somaiya | i will not spare cm uddhav thackeray and sanjay raut bjp leader kirit somaiya on attack by shiv sena in pune

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 928 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Government Jobs in Maharashtra | 10 वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ! आजच करा याठिकाणी अप्लाय

Buldhana Crime | DJ बंद करायला सांगितल्याने पोलीस स्टेशनमध्येच राडा अन् तोडफोड; ठाणे अंमलदार जखमी, दोन महिलांसह 6 जणांवर FIR

 

Related Posts