IMPIMP

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ एकाच अटीवर वेतनाशिवाय मिळतील 30 हजार रुपये; जाणून घ्या

by nagesh
 7th Pay Commission | central government employee likely to get incentive of rs 30000 conditions apply

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन 7th Pay Commission | केंद्रातील मोदी सरकारकडून (Modi Government) केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee) एक आनंदाची बातमी आहे. नोकरी करत असताना उच्च पदव्या मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन रकमेत पाचपट वाढ (7th Pay Commission) करण्यात आली आहे. याबाबत निर्णय केंद्र सरकारने (Central Government) घेतला आहे. पीएचडी (Phd) सारखी उच्च पदवी संपादन केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन रक्कम 10 हजार रुपयांवरून 30 हजार रुपये केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने (Ministry of Personnel, Public Grievances and Retirement) कर्मचार्‍यांना उच्च पदवी प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन रक्कम वाढवण्यासाठी वीस वर्ष जुन्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. तर, नोकरीदरम्यान उच्च पदव्या प्राप्त करणार्‍या कर्मचार्‍यांना 2 हजार ते 10 हजार रुपये एकरकमी प्रोत्साहन दिले जात होते. मात्र, 2019 पासून ही प्रोत्साहन रक्कम किमान 2 हजार रुपयांवरून 10 हजार रुपये करण्यात आली आहे. (7th Pay Commission)

 

तीन वर्षे अथवा त्यापेक्षा कमी कालावधीचा पदवी, डिप्लोमा (Degree, Diploma) प्राप्त करण्यासाठी 10 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातील. त्याचवेळी, 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधीची पदवी अथवा डिप्लोमा मिळवण्यासाठी 15 हजार रुपये दिले जातील. असं कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या परिपत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, शुद्ध शैक्षणिक शिक्षण अथवा साहित्यिक विषयातील उच्च पात्रता मिळविण्यासाठी कोणतेही प्रोत्साहन दिले जाणार नाही. कर्मचार्‍याने मिळवलेली पदवी/डिप्लोमा कर्मचार्‍याच्या पदाशी संबंधित अथवा पुढील पोस्ट मध्ये करावयाच्या कामाशी संबंधित असावा. योग्यता आणि काम यांचा थेट संबंध असावा असे त्यात नमूद केले आहे. हे बदल 2019 पासून लागू झाले आहेत. असं कार्मिक मंत्रालयाचा निर्देशामध्ये सांगितले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोणाला मिळणार 30 हजार रुपये?
1 वर्ष अथवा त्यापेक्षा कमी कालावधीची पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा प्राप्त करण्यासाठी 20 हजार दिले जातील.
त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी/पदविका एक वर्षापेक्षा अधिक काळ घेतलेल्या कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये मिळतील.
ज्यांनी Phd अथवा त्याच्या समकक्ष पात्रता संपादन केली आहे. त्यांना 30 हजार रुपये दिले जातील.

 

Web Title :- 7th Pay Commission | central government employee likely to get incentive of rs 30000 conditions apply

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya On Uddhav Thackeray | ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादला आमदार विकत घ्यायला चाललेत का?’ – किरीट सोमय्या

Tata Group Companies Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीमुळे गुंतवणूकदार झाले मालामाल; 17 रुपयांचा शेअर 8600 रुपयांवर, जाणून घ्या

Kupwara Encounter Updates | भारतीय लष्कराची मोठी कारवाई ! चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा

 

Related Posts