IMPIMP

Kupwara Encounter Updates | भारतीय लष्कराची मोठी कारवाई ! चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा

by nagesh
Kupwara Encounter Updates | jammu and kashmir three lashkar terrorists including a pakistani terrorist killed in kupwara encounter jk police

जम्मू-काश्मीर : वृत्तसंस्था Kupwara Encounter Updates | काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यातल्या जालुरा भागात लष्कर ए तोएबाच्या (Lashkar-e-Taiba) एक आणि कुपवाडा परिसरात दोन अतिरेक्यांना ठार (Kupwara Encounter Updates) मारण्यात भारतीय लष्कर (Indian Army) आणि स्थानिक पोलीसांना (JK Local Police) यश आलं आहे. हे तिन्ही अतिरेकी (Terrorist) एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. यातला एक अतिरेकी हा पाकिस्तानी आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

काल (सोमवारी) रात्री हे एन्काऊंटर (Kupwara Encounter Updates) सुरु झालं होतं. त्याचा शेवट दोन्ही अतिरेक्यांच्या खात्म्यानं झाला आहे. अद्याप ऑपरेशन सुरूच आहे. कारण तिसऱ्या अतिरेक्याचा शोध जंगलात सुरु आहे. कुपवाडा परिसरातही चकमक सुरू आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार (IGP Vijay Kumar) यांनी सांगितलं की, एलईटीचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यात पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. असं एएनआयने ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

 

 

दरम्यान, सोपोरच्या जालूर भागातील पाणीपुरा जंगलात दहशतवाद्यांवर कारवाई करत
सुरक्षा दलांनी तिथं घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. असं एका पोलीस (JK Police) अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

 

Web Title :- Kupwara Encounter Updates | jammu and kashmir three lashkar terrorists including a pakistani terrorist killed in kupwara encounter jk police

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मोसमी पावसाची प्रतीक्षा ! मान्सून कर्नाटक-गोवा सीमाभागातच रेंगाळला

Crude Oil Prices | कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल महागणार?

Maharashtra 12th Result 2022 | 12 वी बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला लागण्याची शक्यता; विद्यार्थी-पालकांची उत्सुकता शिगेला

 

Related Posts