IMPIMP

AB de Villiers | एबी डिविलियर्सच्या चाहत्यांना धक्का ! ‘मिस्टर 360 डिग्री’नं घेतला मोठा निर्णय

by nagesh
AB de Villiers | end of an era rcb post heartfelt message after former south african cricket captain ab de villiers announces retirement

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने (AB de Villiers) नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त (Retirement) होत असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने हि घोषणा केली आहे. एबी डिविलियर्सला (AB de Villiers) क्रिकेट (Cricket) जगतात ‘मिस्टर 360 डिग्री’ (Mr 360 Degree) या नावाने ओळखले जायचे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एबी डिविलियर्सने काय म्हटले आहे ट्विटमध्ये?

एबी डिविलियर्सने (AB de Villiers) आपल्या ट्विटमध्ये ‘हा खूप अविश्वसनीय प्रवास होता, पण मी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होचा ण्यानिर्णय
घेतला आहे. अंगणात मोठ्या भावांसह सामने खेळण्यापासून मी हा खेळ पूर्ण आनंदाने आणि बेलगाम उत्साहाने खेळलो. आता मी ३७ वर्षांचा झालो
आहे. ज्योत आता तितकी तेजस्वीपणे जळत नाही आहे. अशा आशयाची पोस्ट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

डिविलियर्सने मे 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण तो आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर जगभरातील विविध लीग स्पर्धांमध्ये खेळताना
दिसत होता. मात्र आता त्याने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो अखेरचा आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal
Challengers Bangalore) संघाकडून खेळताना दिसला होता. एबी डिव्हिलियर्सने आपल्या संपूर्ण T20 कारकिर्दीत 9424 धावा केल्या आहेत. यामध्ये
4 शतके, 69 अर्धशतके यांचा समावेश आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 340 T20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याची फलंदाजीची सरासरी
37.24 होती. डीव्हिलियर्सने (AB de Villiers) आपल्या टी-20 कारकिर्दीत 436 षटकार ठोकले आहेत तर 230 झेलसुद्धा घेतले आहेत.

 

Web Title :- AB de Villiers | end of an era rcb post heartfelt message after former south african cricket captain ab de villiers announces retirement

 

हे देखील वाचा :

Indian Digital Currency | भारताची असेल स्वतःची क्रिप्टोकरन्सी ! RBI पुढील वर्षी आणू शकते इंडियाची डिजिटल करन्सी

Cheteshwar Pujara | तब्बल 6 वर्षांनंतर इंग्लिश खेळाडूने मागितली चेतेश्वर पुजाराची ‘माफी’, जाणून घ्या प्रकरण

Tim Paine | अश्लील मेसेज अन् आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरण ! अ‍ॅशेस सीरिजपूर्वी ऑस्ट्रेलियाचा टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेनचा राजीनामा

 

Related Posts