IMPIMP

Cheteshwar Pujara | तब्बल 6 वर्षांनंतर इंग्लिश खेळाडूने मागितली चेतेश्वर पुजाराची ‘माफी’, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Cheteshwar Pujara | former yorkshire pacer jack brooks sorry for calling cheteshwar pujara steve

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याची 2015 मध्ये त्याच्या कठीण नावामुळे इंग्लंडमध्ये (England) थट्टा करण्यात आली होती. यॉर्कशायर काउंटी संघाकडून खेळताना पुजाराला (Cheteshwar Pujara) सहकारी खेळाडू त्याचे खरे नाव न उच्चारता स्टीव्ह (Steve) या नावाने हाक मारत होते. यानंतर आता तब्बल 6 वर्षांनंतर पुजाराचा साथीदार असलेला इंग्लिश क्रिकेटर जॅक ब्रूक्सने (Jack Brooks) आपली चूक लक्षात आल्यावर पुजाराची माफी मागितली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

जॅक ब्रूक्सने एका निवेदनात आपली चूक मान्य केली आहे. आम्ही खेळाडूंची आडनावे त्यांच्या पंथाची, वंशाची पर्वा न करता देत होतो. माझ्याकडूनही ही चूक झाली आहे. मला ते मान्य आहे. असे करणे अपमानास्पद आणि चुकीचे होते. मी चेतेश्वरशी (Cheteshwar Pujara) संपर्क साधला. त्याची आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागतो. मी त्याला सांगितले की माझ्यामुळे त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला दुखावले असेल तर मी माफी मागतो. तेव्हा हे जातीय वर्तन आहे हे मला माहीत नव्हते, पण आज मी मानतो की ते सहन करण्यासारखे नव्हते. इंग्लिश क्रिकेटपटूंना ‘चेतेश्वर पुजारा’ म्हणणे खूप अवघड होते आणि त्यांना हे नाव उच्चारता येत नव्हते म्हणून ते पुजाराला स्टीव्ह नावाने हाक मारत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

‘त्या’ वादग्रस्त ट्विटबद्दल ब्रूक्सने मागितली माफी

जॅक ब्रूक्सने 2012 मध्ये केलेल्या वादग्रस्त ट्विटबद्दलही माफी मागितली होती. यामध्ये त्याने “मी कबूल करतो की 2012 मध्ये माझ्या दोन ट्विटमध्ये वापरलेली भाषा अस्वीकार्य होती आणि मला ती वापरल्याबद्दल मनापासून खेद वाटते. मी त्याबद्दल बिनशर्त माफी मागतो. मी ज्या दोन खेळाडूंना ट्विट केले ते माझे मित्र आहेत आणि मला असे म्हणायचे नव्हते. तसेच त्यांना त्राससुद्धा द्यायाचा नव्हता.”

 

Web Title :- Cheteshwar Pujara | former yorkshire pacer jack brooks sorry for calling cheteshwar pujara steve

 

हे देखील वाचा :

Tim Paine | अश्लील मेसेज अन् आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरण ! अ‍ॅशेस सीरिजपूर्वी ऑस्ट्रेलियाचा टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेनचा राजीनामा

IPS Rashmi Shukla | भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण : IPS रश्मी शुक्ला आयोगासमोर हजर; मात्र, ‘या’ कारणामुळं साक्ष नोंदवण्यात आली नाही

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

 

Related Posts