IMPIMP

Indian Digital Currency | भारताची असेल स्वतःची क्रिप्टोकरन्सी ! RBI पुढील वर्षी आणू शकते इंडियाची डिजिटल करन्सी

by nagesh
RBI | rbi going to make big announcement big profit will be given on fixed deposit know how

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था Indian Digital Currency | भारतीय रिझर्व्ह (RBI) पुढील वर्षी आपली डिजिटल करन्सी (Indian Digital Currency) लाँच करू शकते. यासाठी आरबीआय सातत्याने काम करत आहे आणि यासाठी एक प्लान सुद्धा बनवला आहे. रॉयटर्सने एका स्थानिक वृत्तपत्राचा संदर्भ देत वृत्त दिले आहे की, भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ‘बँकिंग अँड इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह’मधील केंद्रीय बँकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने याची पूर्ण शक्यता वर्तवली आहे (RBI may brings India’s digital currency in next year).

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आरबीआयची पायलट डिजिटल करन्सी

आरबीआयमध्ये पेमेंट आणि सेटलमेंट विभागाचे मुख्य महा व्यवस्थापक पी. वासुदेवन ( Chief General Manager, Payments and Settlement, P. Vasudevan) यांच्या संदर्भाने बिझनेस स्टँडर्डने लिहिले आहे की, पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पायलट आधारावर डिजिटल करन्सी (Indian
Digital Currency) जारी केली जाऊ शकते. यासाठी आम्ही खुप आनंदी आहोत.

 

 

कशी असेल आरबीआयची डिजिटल करन्सी?

आरबीआय पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDCs) लाँच करू शकते. ही डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी असेल. पण ही
भारताच्या मुळ चलनाचेच डिजिटल रूप असेल म्हणजे ती डिजिटल रुपया असेल.

यापूर्वी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत CBDCs च्या सॉफ्ट लाँचची शक्यता
वर्तवली होती. मात्र, यासाठी त्यांनी कोणतेही टाइम लिमिट सांगितले नव्हते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

लाँचपूर्वी सुरू आहे यावर विचार

वासुदेवन यांनी म्हटले की, भारताची डिजिटल करन्सी लाँच (India’s digital currency) करणे इतके सोपे नाही आणि हे उद्यापासून ताबडतोब लोकांच्या जीवनाचा भाग बनू शकत नाही. यामुळे घाई केली जाणार नाही. तिच्या लाँच पूर्वी अनेक मुद्द्यांवर विचार सुरू आहे. या करन्सीची भूमिका काय असेल, ती कशी लागू करावी, तिला मान्यता देण्याची पद्धत काय असेल, तिची माहिती कशी राहिल, ती घाऊक व्यवहारासाठी उपयोगी येईल की, किरकोळ व्यवहारात सुद्धा वापरता येऊ शकते.

 

Web Title: Indian Digital Currency | rbi may launch indian digital currency or cryptocurrency on pilot basis q1 of next year reserve bank of india

 

हे देखील वाचा :

Cheteshwar Pujara | तब्बल 6 वर्षांनंतर इंग्लिश खेळाडूने मागितली चेतेश्वर पुजाराची ‘माफी’, जाणून घ्या प्रकरण

Tim Paine | अश्लील मेसेज अन् आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरण ! अ‍ॅशेस सीरिजपूर्वी ऑस्ट्रेलियाचा टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेनचा राजीनामा

IPS Rashmi Shukla | भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण : IPS रश्मी शुक्ला आयोगासमोर हजर; मात्र, ‘या’ कारणामुळं साक्ष नोंदवण्यात आली नाही

 

Related Posts