IMPIMP

Tim Paine | अश्लील मेसेज अन् आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरण ! अ‍ॅशेस सीरिजपूर्वी ऑस्ट्रेलियाचा टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेनचा राजीनामा

by nagesh
Tim Paine | Before Ashes Series tim paine step down as the australian test captain after send explicit image to the co worker

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Tim Paine | ऑस्ट्रेलियाच्या (Australia) टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेननं (Tim Paine) आज आपल्या कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्यात इंग्लंड (England) विरुद्ध होणाऱ्या प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस सीरिजपूर्वी (Ashes Series) त्यानं ही घोषणा केली आहे. महिला सहकाऱ्याला अश्लील मेसेज आणि आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरणात त्यानं हा राजीनामा दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. टीम पेननं (Tim Paine) पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ‘मी आज ऑस्ट्रेलियन टीमची कॅप्टनसी सोडत आहे. हा एक अवघड निर्णय असला तरी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि क्रिकेटसाठी योग्य आहे.’ असे पेनने यावेळी जाहीर केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

चार वर्षांपूर्वी महिला कर्मचाऱ्याला पाठवलेल्या अश्लील मेसेज प्रकरणात पेननं हा राजीनामा दिला आहे. त्याचा राजीनामा स्विकारला असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आले. टीम पेनच्या (Tim Paine) जागी टेस्ट टीमच्या कॅप्टनपदासाठी पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नावाची चर्चा सुरु झाली आहे. तसेच स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि मार्नस लबूशेन (Marnus Labushen) यांची नावेदेखील चर्चेत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस सीरिजला 8 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.

 

काय म्हणाला टीम पेन?

‘माझ्या राजीनाम्याचे कारण चार वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. त्यावेळी मी (Tim Paine) एका सहकाऱ्याला मेसेज केले होते.
त्या प्रकरणाची क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून (Cricket Australia) चौकशी करण्यात आली. मी या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं.
त्या प्रकरणात कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचं या चौकशीमध्ये निष्पन्न झालं. यानंतर माझी या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणानंतर मी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं होतं. मागील तीन-चार वर्षांमध्ये मी तेच केले.
यानंतर ते सर्व मेसेज सार्वजनिक होत असल्याचं मला समजले. तेव्हा माझी 4 वर्षांपूर्वीची कृती ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन म्हणून असलेल्या अपेक्षांना योग्य नाही.
मी तातडीने कॅप्टनसी सोडत आहे. अ‍ॅशेससारख्या मोठ्या सीरिजपूर्वी माझी कृती टीमसाठी त्रासदायक ठरू नये, अशी माझी इच्छा आहे.’
असं पेनने यावेळी स्पष्ट केले. तसेच त्याने पत्नी, कुटुंब आणि दुसऱ्या पक्षाला झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title :- Tim Paine | Before Ashes Series tim paine step down as the australian test captain after send explicit image to the co worker

 

हे देखील वाचा :

IPS Rashmi Shukla | भीमा-कोरेगाव दंगल प्रकरण : IPS रश्मी शुक्ला आयोगासमोर हजर; मात्र, ‘या’ कारणामुळं साक्ष नोंदवण्यात आली नाही

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Police Patil | पोलीस पाटील पदासाठी 12 वी हवीच ! 10 वी पास उमेदवारांची नियुक्ती रद्द; ‘मॅट’चा महत्त्वपूर्ण निर्णय

 

Related Posts