IMPIMP

Aba Bagul | ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास आई-वडील व गुरूंशिवाय मिळत नाही – आबा बागुल

by nagesh
Aba Bagul | Knowledge, behavior, conscience, confidence cannot be obtained without parents and teachers - Aba Bagul

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Aba Bagul | ज्ञान, व्यवहार , विवेक, आत्मविश्वास हे आई -वडील आणि गुरूंशिवाय मिळत नाही असे प्रतिपादन पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल (Aba Bagul) यांनी केले. (Pune Congress Leader Aba Bagul)

 

गुरुपौर्णिमेनिमित्त समाजकारण – राजकारणात सदैव मार्गदर्शन करणारे पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांच्याप्रती आदराच्या भावना व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या विशेष सोहळ्यात आबा बागुल हे बोलत होते.

 

याप्रसंगी संयोजक अमित बागुल (Amit Bagul) , नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, अरुण कामठे, अश्विनी ताटे, हेमंत बागुल, कपिल बागुल हे उपस्थित होते. (Aba Bagul)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यावेळी आबा बागुल म्हणाले की, युवा पिढीचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टीने गुरु – शिष्याचे नाते हे सदैव महत्वपूर्ण आहे. केवळ विद्या देऊन गुरुचे कार्य संपत नाही तर आपल्या जीवनविषयक अनुभवातून आलेले शहाणपण शिष्यापर्यंत पोहचविण्याचे कार्य गुरु करीत असतो. एकप्रकारे गुरु हा दिशादर्शक आहे. ज्ञान, व्यवहार , विवेक, आत्मविश्वास हे आई -वडील आणि गुरूंशिवाय मिळत नाही, असेही आबा बागुल म्हणाले.

 

यावेळी आबांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांकडून पाद्यपूजन करून अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली व विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली कार्यकर्त्यांचे असे प्रेम पाहून आबा बागुल भावुक झाले होते त्यांना पाहून कार्यकर्त्यांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले.

 

समाजकारणात कार्य करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे धडे आम्ही आबासाहेब बागुल यांच्याकडून घेतले आहेत.
सामाजिक जीवनात जसे ते आमच्यासाठी दिपस्तंभ आहेत,त्याचप्रमाणे व्यक्तिगत आयुष्यात ते एक दिशादर्शक आणि आधारवडही आहेत.

जीवनात जगायचे कसे हे त्यांनीच शिकवले. राजकारणात अन्याय झाला तरी तो वाटून न घेता संयम ठेवून समाजाच्या
हितासाठी पुढे चालत राहायचे हे त्यांच्याकडूनच आम्ही आत्मसात केले अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश ढवळे, सागर आरोळे, इम्तियाज तांबोळी, बाबासाहेब पोळके, समीर शिंदे,
संतोष पवार, राजाभाऊ पोळ, लक्ष्मण कुतवळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Aba Bagul | Knowledge, behavior, conscience, confidence cannot be obtained without parents and teachers – Aba Bagul

 

हे देखील वाचा :

Rain in Pune | पुण्यात अतिवृष्टीचा इशारा! कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचे PMC चे आवाहन

Collector Dr. Rajesh Deshmukh | गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात 17 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू; जाणून घ्या जिल्हाधिकार्‍यांनी नेमके कोणते आदेश काढलेत

Rain in Pune | पुण्यातील कात्रज घाटात दरड कोसळली; 15 दिवसातील तिसरी घटना

 

Related Posts