IMPIMP

Pune Crime News | पुणे : आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेत कोट्यवधींचा घोटाळा, बनावट आस्थापना तयार करून सव्वा दोन कोटींचा पीएफ काढला

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे :  – Pune Crime News | कोरोनाच्या काळात (Corona) औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी आणि नवीन उद्योगांना पीएफ योगदानात मदत करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेत (ABRY) मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील 89 आस्थापनांनी पी.एफ. रक्कम घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करुन तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ABRY Scam In Pune)

याबाबत मनोजकुमार असराणी (वय-45 रा. रावेत, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या पि.एफ. रक्कमेचा फायदा घेणाऱ्या आस्थापनाच्या प्रोपराटरवर आयपीसी 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 31 डिसेंबर 2020 ते 3 डिसेंबर 2023 या कालावधीत भविष्य निर्वाह निधी संघटन, गोळीबार मैदान (PF Office Golibar Maidan) येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भविष्य निर्वाह निधी संघटन, गोळीबार मैदान येथे नोकरी करतात. 89 आस्थापनांनी भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या पी.एफ. रक्कमेचा फायदा घेण्यासाठी पीएफ कार्य़ालयात पी.एफ नंबर मिळवण्यासाठी अर्ज केला. पी.एफ. नंबर मिळाल्यानंतर त्याकरीता लागणारी कागदपत्रे तयार केली. आस्थापना प्रोपरायटर यांनी बनावट शॉप अॅक्ट, वेगवेगळी नावे व पता, सर्वांचे मोबाईल क्रमांक फिर्यादी यांच्या कार्यालयास सादर केली.

भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयाच्या तपासणीमध्ये आरोपींनी दिलेले मोबाईल क्रमांक एकच असल्याचे दिसून आले. 89 आस्थापना पैकी 42 आस्थापनांनी भारत सरकारकडून तब्बल 9 कोटी 56 लाख 76 हजार 123 रुपये बोगस कामगारांच्या नावाने घेतले. त्यापैकी 2 कोटी 40 लाख 85 हजार 910 रुपये काढून घेतले. तर 47 आस्थापनांनी 8 कोटी 89 लाख 35 हजार 246 रुपये बोगस कामगारांच्या नावावर घेतले. त्यापैकी 2 कोटी 21 लाख 8 हजार 577 रुपये काढून स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. आस्थापनांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या पी.एफ. रक्कमेचा गैरलाभ घेवून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts