IMPIMP

Abbott India | 275 रुपयांचा डिव्हिडंट देत आहे ‘ही’ फार्मा कंपनी, 7000% दिला आहे रिटर्न

by nagesh
Abbott India | abbott india announced per share 145 rupee final dividend 130 rupee special dividend

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Abbott India | एक दिग्गज फार्मा कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत डिव्हिडंट देणार आहे. ही कंपनी अ‍ॅबॉट इंडिया (Abbott India) आहे. कंपनीने जाहीर केले आहे की त्यांच्या संचालक मंडळाने मार्च 2022 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 145 रुपये फायनल डिव्हिडंट आणि 130 रुपये स्पेशल डिव्हिडंट मंजूर केला आहे. हा फायनल डिव्हिडंट 17 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यानंतर दिला जाईल.

कंपनीचा नफा 39% ने वाढून रु. 211 कोटी

मार्च 2022 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत अ‍ॅबॉट इंडियाचा निव्वळ नफा 39 टक्क्यांनी वाढून 211 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात अ‍ॅबॉट इंडियाला 152 कोटी रुपयांचा नफा झाला होता. (Abbott India)

जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वाढून रु. 1,255 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत रु. 1,096 कोटी होता. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीने 799 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीला 691 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

कंपनीच्या शेअरनी दिला 7,000% पेक्षा जास्त रिटर्न

18 जानेवारी 2002 रोजी अ‍ॅबॉट इंडियाचा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) वर 239.55 रुपयांच्या पातळीवर होता. 18 मे 2022 रोजी कंपनीचा शेअर 17,820 रुपयांवर बंद झाला आहे.

या कालावधीत कंपनीच्या शेअरनी 7,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 18 जानेवारी 2002 रोजी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर हे पैसे आता 74.38 लाख रुपये झाले असते.

अ‍ॅबॉट इंडियाच्या शेअरने गेल्या 5 वर्षांत 322 टक्के रिटर्न दिला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 23,934.45 रुपये आहे. Abbott India च्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 15,514 आहे.

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Abbott India | abbott india announced per share 145 rupee final dividend 130 rupee special dividend

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

TTML Share Price | 12 रुपयांवरून वाढून 125 रुपयांच्या पुढे गेला टाटा ग्रुपचा हा शेअर, गुंतवणुकदारांचे 1 लाख झाले 9.78 लाख रुपये

Pune Crime | हडपसरमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार अड्ड्यावर छापा

Aurangabad News | औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी 5 दिवस बंद – पुरातत्त्व विभाग

Related Posts