IMPIMP

Aurangabad News | औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी 5 दिवस बंद – पुरातत्त्व विभाग

by nagesh
Aurangabad News | aurangzeb tomb closed for 5 days for tourists Department of Archeology

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – Aurangabad News | औरंगाबादच्या (Aurangabad News) दौऱ्यावर असताना एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (MIM Leader Akbaruddin Owaisi) यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangzeb Kabar) फुले वाहत त्या ठिकाणी दर्शन घेतले होते. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्या या कृतीचा शिवप्रेमी जनतेकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. एकीकडे औरंगजेबाच्या कबर वरून वाद सुरू असतानाच पुरातत्व विभागाकडून (Department of Archeology) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगजेब कबर पर्यटकांसाठी (Tourists) आगामी पाच दिवस बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

औरंगजेबच्या कबरीवर एमआयएमचे नेते नतमस्तक झाल्यानंतर घडामोडींना वेग आला होता. त्यानंतर औरंगजेब कबर समितीने (Aurangzeb Tomb Committee) पुरातत्व विभागाकडे काही दिवस ही कबर बंद ठेवण्याची मागणी केली होती. यानंतर पुरातत्व विभागाने सद्यस्थिती पाहता पर्यटकांसाठी औरंगजेबाची कबर आगामी पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वातावरण पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील परिस्थिती पाहता हा प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (Aurangabad News)

दरम्यान, ओवैसींच्या कृत्याचा शिवसेना (Shivsena), भाजप (BJP) आणि मनसेसह (MNS) इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. क्रूर मुघल बादशहाने महाराष्ट्राचे एवढे नुकसान केल्यानंतर देखील त्याच्या कबरीसमोर कुणी नतमस्तक कसे होऊ शकते, असा सवाल करण्यात येत आहे. यावरून भाजप आणि मनसेने महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) हल्लाबोल केला आहे.

Web Title : Aurangabad News | aurangzeb tomb closed for 5 days for tourists Department of Archeology

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala Portfolio Stock | रू. 2900 वर जाईल टाटा ग्रुपचा हा स्टॉक, राकेश झुनझुवाला यांचा आहे फेव्हरेट, आता खरेदी केल्यास मोठा नफा

Sanjay Raut on Nana Patole | ‘मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता, हे नाना पटोले यांना आठवतंय तरी का?’ – संजय राऊत

Nashik Crime | धक्कादायक ! 24 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण; जाणून घ्या लेटेस्ट रेट

Gopichand Padalkar | ‘पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा …’ गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

Related Posts