IMPIMP

ABRY | 15 हजारपेक्षा कमी पगार असणार्‍यांना सरकार देतंय मोठा फायदा, योजनेत रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख जाणून घ्या

by nagesh
ABRY | Modi government is giving big benefits to those with less than 15 thousand salary this was the last date for registration in the scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Atmanirbhar Bharat Rojgar Yojana | केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेंतर्गत (Atmanirbhar Bharat Rojgar Yojana) रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख वाढून 31 मार्च 2022 केली आहे. ज्याबाबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

ज्यामध्ये म्हटले आहे की, ABRY अंतर्गत रजिस्ट्रेशनची तारीख वाढवून 31 मार्च 2021 केली जात आहे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची सुरुवात केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या दरम्यान केली होती. ज्यामध्ये कर्मचार्‍यांना अनेक फायदे मिळतात. या फायद्यांबाबत जाणून घेवूयात :

 

– EPFO मध्ये रजिस्टर कंपन्या आणि नवीन कर्मचार्‍यांसाठी इन्सेटिव्ह मिळतो.

– नवीन कर्मचार्‍यांना त्याच्या रजिस्ट्रेशनच्या तारखेपासून दोन वर्षासाठी इन्सेटिव्ह मिळतो.

– पेमेंटवर सुद्धा इन्सेटिव्ह मिळतो. कर्मचारी आणि कंपनी दोघांचे अंशदान जे वेतनाच्या 24 टक्के असते. 1000 कर्मचार्‍यांपेक्षा जास्त ऑफिसमधील कर्मचार्‍यांना 12 टक्के ईपीएफमध्ये द्यावे लागतात.

– निर्धारित किमान संख्येत नवीन कर्मचार्‍यांचा समावेश केल्यास इन्सेटिव्ह मिळतो.

– 15000 पेक्षा कमी मासिक वेतनासह सहभागी होणारे नवीन कर्मचार्‍यांना नोंदणी तारखेपासून 24 वेतन महिन्यांसाठी लाभ प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

– ईपीएफओसोबत 1 ऑक्टोबर 2020 च्या नंतर रजिस्टर ऑफिसला नवीन कर्मचार्‍यांसोबत बेनिफिट्स मिळतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना –

ABRY च्या अंतर्गत सरकार 1,000 कर्मचार्‍यांच्या संस्थेच्या संबंधात कर्मचारी आणि कंपनी दोघांचे वेतनाच्या 24 टक्के (दोघांसाठी वेतनाच्या 12 टक्के) पेमेंट करत आहेत. तसेच कर्मचार्‍यांची संख्या 1,000 पासून जास्त असल्यास कर्मचार्‍याचे 12 टक्के योगदान सुद्धा सरकार करेल. 4 डिसेंबर 2021 पर्यंत, 39.73 लाख नवीन कर्मचार्‍यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि त्यांच्या खात्यात 2612.10 कोटी रुपयांचा लाभ अगाऊ जमा करण्यात आला आहे.

 

कधी सुरू झाली योजना –

आत्मनिर्भर भारत योजनेची सुरुवात मागच्या वर्षी 1 ऑक्टोबरला करण्यात आली होती.
या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) देण्यात येणार्‍या
योगदानात सरकारी मदतीद्वारे कंपन्यांना नवीन रोजगार निर्माण करणे, रोजगारानुसार नुकसान भारपाईसाठी प्रोत्साहन देण्यात आले.

 

योजनेंतर्गत 58.50 लाख अंदाजित लाभार्थ्यांसाठी 22,810 कोटी रुपयांच्या वाटपाला मंजूरी दिली गेली आहे.
ज्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख अगोदर 30 जून 2021 होती.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- ABRY | Modi government is giving big benefits to those with less than 15 thousand salary this was the last date for registration in the scheme

 

हे देखील वाचा :

Rupali Thombare-Patil | पक्षात प्रवेश करताच रुपाली ठोंबरे-पाटील यांना अजित पवारांकडून मिळालं ‘हे’ मोठं गिफ्ट

Saif Ali khan | पहिल्या भेटीतच अमृताकडून सैफ अली खाननं मागितले 100 रूपये उधार, जाणून घ्या किस्सा..

Malaika Arora | मलाइका अरोरानं काळ्या रंगाच्या वेलवेट ड्रेसमध्ये दिली बोल्ड पोज, फोटोनं सोशल मीडियाचा वाढला पारा..

 

Related Posts