IMPIMP

Rupali Thombare-Patil | पक्षात प्रवेश करताच रुपाली ठोंबरे-पाटील यांना अजित पवारांकडून मिळालं ‘हे’ मोठं गिफ्ट

by nagesh
Rupali Thombare Patil | dcm ajit pawar gift to rupali thombare patil join ncp over pune municipal election pune mahapalika nivadnuk

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यातील मनसे (Pune MNS) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Thombare-Patil) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत रुपाली पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील उपस्थित होते. रुपाली पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना मोठं गिफ्ट दिलं. भाषणाच्या दहाव्या मिनिटालाच त्यांनी ‘रुपालीताई सारख्या भगिनी पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) हव्या आहेत’ असे म्हणत एकप्रकारे त्यांना महापालिकेच्या तिकीटाचे (Municipal Corporation ticket) संकेत दिले. अजित पवारांनी तिकीटाचे संकेत देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. (Rupali Thombare-Patil)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने हा राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा धक्का मानला जात आहे. रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या कामाची पद्धत पाहता पक्षाकडून त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या 15 मिनीटाच्या भाषणात रुपाली पाटील यांचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच रुपालीताईंसारख्या भगिनी महापालिकेत हव्या आहेत, त्यांचा राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल, असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीसह त्यांना राष्ट्रवादीने स्विकारल्याचे जाहीर केलं.

 

अजित पवारांकडून कौतुक
अजित पवार म्हणाले, जयंतराव, रुपालीताई (Rupali Thombare-Patil) एवढ्या आक्रमकपणे काम करतात, मला आठवतंय, एक निवडणूक अशी होती, की त्या निवडणुकीचा प्रचार करत होत्या, त्यावेळी त्या गरोदर (Pregnant) होत्या. त्या प्रचारातच त्यांची डिलिव्हरी झाली. लोकांच्या प्रश्नावर रुपालीताईंचं काम खरंच खूप चांगले आहे. लोकांचे प्रश्न तडीस लागले पाहिजेत हा त्यांचा प्रयत्न असतो, अशा शब्दात अजित पवार यांनी रुपाली पाटील यांचे कौतुक केलं.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

महापालिकेत संधी मिळाली पाहिजे
अजित पवार पुढे म्हणाले, ज्यांच्याकरिता काम करायचं, तिथं अचानक मॅच फिक्सिंग (Match fixing) होतं, उमेदवारी काढली जाते,
मागे घेतली जाते, तुम्ही लढू नका सांगितलं जातं. पण रुपालीताईंना मला सांगायचंय, तुम्ही कोणत्याही प्रकारची भावना मनात आणू नका.
निश्चितच तुमच्यासारख्या भगिनींना पुणे महापालिकेत संधी मिळाली पाहिजे. शहरवासीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी,
वॉर्डाचे-प्रभागाचे प्रश्न सोडविण्याकरिता, तुमचा उपयोग, तुमचं काम निश्चितपणे राष्ट्रवादीला मदतीचं ठरेल, हा विश्वास वाटतो.

 

हीच राष्ट्रवादीच्या कामाची पद्धत
रुपालीताईंचं (Rupali Thombare-Patil) काम धडाडीचे आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
आता छोटेखानी कार्यक्रम घेतलाय, पुण्यात मोठा कार्यक्रम घेऊ. रुपालीताईंचा मोठा फायदा आपल्याला जिल्ह्यात होणार आहे.
चांगल्या महिलांना, कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाणं, हीच राष्ट्रवादीच्या कामाची पद्धत आहे.
कोण आता आलाय, कोण मध्ये आलाय, कोण नंतर आलाय, असा भेदभाव राष्ट्रवादीमध्ये केला जात नसल्याचे अजित पवारांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Rupali Thombare Patil | dcm ajit pawar gift to rupali thombare patil join ncp over pune municipal election pune mahapalika nivadnuk

 

हे देखील वाचा :

Saif Ali khan | पहिल्या भेटीतच अमृताकडून सैफ अली खाननं मागितले 100 रूपये उधार, जाणून घ्या किस्सा..

Maharashtra Board Exam | राज्यात 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Malaika Arora | मलाइका अरोरानं काळ्या रंगाच्या वेलवेट ड्रेसमध्ये दिली बोल्ड पोज, फोटोनं सोशल मीडियाचा वाढला पारा..

 

Related Posts