IMPIMP

ACB Arrest PWD Executive Engineer | सार्वजनिक बांधकाम विभागातील मोठा मासा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात ! घटनास्थळी लाच रक्कमेव्यतिरिक्त 6 लाख 40 हजार मिळाले

by nagesh
ACB Arrest PWD Executive Engineer | Nagpur Wardha Anti Corruption Bureau Arrest Public Works Department Executive Engineer Prakash Narayandas Bub In Bribe Case

वर्धा : सरकारसत्ता ऑनलाईन   ACB Arrest PWD Executive Engineer | 50 लाखाच्या बिलासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून
लाचेची रक्कम शासकीय निवासस्थानी घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास अटक केली आहे
(Wardha ACB Trap). त्यांच्याविरूध्द वर्धा शहर पोलिस ठाण्यात (Wardha City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Arrest
PWD Executive Engineer)

 

प्रकाश नारायणदास बुब Prakash Narayandas Bub (57, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा. रा. पारिजात, कार्यकारी अभियंता यांचे शासकीय निवासस्थान, वर्धा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या संस्थेचे शासकीय करारानुसार वृक्ष लागवडीचे अगोदर तिन टप्प्याचे बील मिळाले होते. चौथ्या टप्प्यातील 50 लाखाच्या बिलासाठी कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी तक्रारदारास त्रास दिला (Wardha Bribe Case). त्यांच्याकडे बिलाच्या पाच टक्के म्हणजेच 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली. (ACB Arrest PWD Executive Engineer)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, गुरूवारी कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडून सरकारी पंचासमक्ष 1 लाख रूपयाची लाच घेतली. त्यावेळी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. घटनास्थळी लाच रक्कमेव्यतिरिक्त 6 लाख 40 हजार रूपये मिळाले. ती रक्कम अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने व्हिडिओग्राफी करून जप्त केली आहे. प्रकाश बुब यांच्याविरूध्द वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर (Nagpur ACB SP Rahul Maknikar), अप्पर अधीक्षक मधुकर गितेनागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर  (Addl SP Madhukar Gite) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक डी.सी. खंडेराव (DySP DC Khanderao), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बावणेर, पोलिस हवालदार संतोष बावणकुळे, प्रशांत वैद्य, पोलिस अंमलदार प्रदीप कुचनकर, प्रितमइंगळे, प्रशांत मानमोडे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- ACB Arrest PWD Executive Engineer | Nagpur Wardha Anti Corruption Bureau Arrest Public Works Department Executive Engineer Prakash Narayandas Bub In Bribe Case

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | खेड : पुर्ववैमनस्यातून 6 जणांकडून युवकाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून

Deepak Kesarkar | ‘राज्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री, त्यामुळे…’- दीपक केसरकर

Maharashtra Politics News | ‘नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी अगोदर आपल्या वडिलांना…’, राणांच्या टीकेवर ठाकरे गटाचा पलटवार

Sandeep Deshpande | ‘म्हणून ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न’, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

 

Related Posts