IMPIMP

Deepak Kesarkar | ‘राज्यात सध्या उद्धव ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री, त्यामुळे…’- दीपक केसरकर

by nagesh
Deepak Kesarkar | deepak kesarkar says uddhav thackeray wanted eknath shinde to be maharashtra cm

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tour)
जाणार आहेत. यावेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांची भेट घेणार आहेत. दोन्ही
मुख्यमंत्र्यांमध्ये अयोध्येतील महाराष्ट्र भवनाबद्दल (Maharashtra Bhavan) चार्चा होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत बोलताना मंत्री
दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, अयोध्येत जे मराठी बांधव जातील, त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी तिथे महाराष्ट्र भवन बांधावे ही
मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याचे केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. या दौऱ्यात दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये यावर सकारात्मक चर्चा होईल असेही
त्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून (BJP) होत आहे. याबद्दल दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) साहेबांनी सांगूनही ते आले नाहीत, उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिलेलं वचन मोडलं याचा मी साक्षीदार आहे. दोन्ही पक्षांमध्ये (शिवसेना (Shivsena) आणि भाजप) काही जुळवायचं असेल तर ते केवळ उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.

 

त्यावेळी शरद पवार यांनी…

 

केसकर पुढे म्हणाले, मागे एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद दिला होता. मात्र त्यांनी ऐकलं नाही. एकनाथ शिंदे सध्या राज्यात चांगलं काम करत आहेत. मुळात उद्धव ठाकरे यांनी ठरवलं होतं की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी माझ्यावर मुखमंत्री होण्यासाठी दबाव टाकला, असं त्यांनी सांगितलं. अन्यथा आता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असते. त्यामुळे राज्यात सध्या ठाकरेंच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना फारसे वाईट वाटलं नसेल.

 

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar says uddhav thackeray wanted eknath shinde to be maharashtra cm

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर बोलण्याची लायकी नाही, त्यांनी अगोदर आपल्या वडिलांना…’, राणांच्या टीकेवर ठाकरे गटाचा पलटवार

Sandeep Deshpande | ‘म्हणून ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न’, मनसेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं

Pune Crime News | वारजे माळवाडी : 10 डिलिव्हरी बॉयकडून 20 लाखाची फसवणूक; डिलिव्हरी प्लस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणार्‍या 10 जणांवर गुन्हा

 

Related Posts