IMPIMP

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी 17 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap Case News | Officers of Pimpri-Chinchwad Municipal Corporation caught in anti-corruption net while taking bribe of 17 thousand

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap Case News | कॉन्ट्रॅक्टरकडून 17 हजाराची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) सहाय्यक उद्यान निरीक्षकास (Assistant Park Inspector) अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption Bureau Pune (ACB Pune) रंगेहाथ पकडले आहेत. त्यांच्याविरूध्द भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap Case News)

किरण अर्जुन मांजरे Kiran Arjun Manjre (46, पद – सहाय्यक उद्यान निरीक्षक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये केलेल्या देखभालीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी मांजरे यांच्याकडे विनंती केली होती.किरण मांजरे यांनी त्यासाठी तक्रारदाराने 17 हजार रूपयाच्या लाचेची (Pune Bribe Case) मागणी केली. (ACB Trap Case News)

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सापळा रचल्यानंतर सरकारी पंचासमक्ष सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांनी तक्रारदाराकडून 17 हजार रूपये घेतले. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये (Bhosari MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे (Addl SP
Dr. Sheetal Janve-Kharade) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे
(PI Shriram Shinde), पोलिस नाईक सुनिल सुरडकर, पोलिस अंमलदार सौरभ महाशब्दे,
पोलिस अंमलदार चालक पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : ACB Trap Case News | Officers of Pimpri-Chinchwad Municipal Corporation caught in
anti-corruption net while taking bribe of 17 thousand

Related Posts