IMPIMP

Advocate Gunratna Sadavarte | ‘एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी पवारांकडे कशाला जाता, ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का?’

by nagesh
 adv gunratna sadavarte criticized ncp chief sharad pawar over presidential election 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Advocate Gunratna Sadavarte | राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगार संपावरुन (ST Workers Strike) गदारोळ निर्माण झाला आहे. यामुळे राजकीय वातावरणात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यातच आता अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘राज्यातील एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करायला हवी होती. मग ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे का गेले? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध प्रमुख शरद पवार हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? असा जोरदार प्रश्न त्यांनी अनिल परबांना विचारला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज सोमवारी सकाळी एसटी कामगारांच्या 22 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार आणि अनिल परब यांची भेट घेतलीय. त्यावेळी कृती संघटनेने आपण गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांच्याकडून वकीलपत्र काढून घेत असल्याचे म्हटले. यावरुन सदावर्ते यांनी एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. सदावर्ते म्हणाले, ‘पवार आणि परब यांच्यासोबतची एसटी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लाजीरवाणा प्रकार होता. ज्या संघटनांकडे कर्मचारीच उरले नाहीत, अशांना बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. संघटनांचे पदाधिकारी बोलण्यापूर्वी शरद पवार यांच्याकडे पाहत होते, त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळत होते. जणूकाही शरद पवार यांचा वाढदिवस होता. तर दुसरीकडे कष्टकऱ्यांना संप मागे घ्यायला सांगत होते. त्यामुळे ही बैठक म्हणजे एखादी शोकसभा वाटत होती. तर संघटनांचे पदाधिकारी कैद्यांसारखे वागत होते.

 

पुढे गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ‘बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हुतात्मा झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांबाबत ब्र ही काढला नाही.
पवार हे एसटी महामंडळाकडे आयपीएलच्या खेळाप्रमाणे बघत आहेत. त्यामुळे आम्ही यावरुन सरकारला सवाल विचारतच राहणार.
मला मान्यता रद्द झालेल्या नेत्याची आणि संघटनांची फिकीर नाही. माझ्याकडे एसटीच्या 75 हजार कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र आहे.
आम्ही शेवट पर्यंत विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहू.
यापुढे एसटी कामगारांच्या होणाऱ्या मृत्यूंसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar),
अनिल परब (Anil Parab) आणि शरद पवार (Sharad Pawar) हेच जबाबदार असतील. असं ते म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Advocate Gunratna Sadavarte | is sharad pawar is caretaker cm of maharashtra advocate gunratna sadavarte asks anil parab over MSRTC emploees strike mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Traffic Police | तुळापुर येथील इंद्रायणी नदीवरील मोठा पुल जड वाहतुकीसाठी बंद

Immunity Booster | सर्दी आणि फ्लू सारख्या लक्षणांमध्ये लवकर आराम देईल ‘हा’ आयुर्वेदिक काढा

Pune Crime | पुण्यात नोकरी गेल्यानं ‘जीवरक्षक’ तरूणाची आत्महत्या, मुंढव्याच्या केशवनगरमधील घटना; जाणून घ्या कारण

 

Related Posts