IMPIMP

Advocate Praveen Chavan | छुपा कॅमेरा कोणी लावला? देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांबद्दल अ‍ॅड. प्रवीण चव्हाणांचा मोठा खुलासा, म्हणाले…

by nagesh
Advocate Praveen Chavan | BJP leader devendra fadnavis pen drive sting operation who put hidden camera in office watch advocate pravin chavan gives answer

सरकारसत्ता ऑनलाइन – Advocate Praveen Chavan | विधानसभेच्या अधिवेशनावेळी सभागृहात पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा हलवून ठेवली होती. यामध्ये फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) आणि काही पोलीस अधिकारी (Police officer) यांना हाताशी धरत विरोधी पक्षातील नेत्यांना अडकवण्याचा षडयंत्र (Conspiracy) रचल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. अशातच यावर फडणवीस यांनी आरोप केलेले वकील प्रवीण चव्हाण (Advocate Praveen Chavan) यांनी आपली प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फडणवीसांनी केलेल्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही. भाजपचा (BJP) हा केविलवाणा प्रयत्न आहे. व्हिडीओमधील आवाज मॅनिप्युलेट (Manipulator) केले आहेत. याबाबत स्टिंग ऑपरेशनच्या (Sting operation) संदर्भात चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल असं वकील प्रवीण चव्हाण म्हणाले. माझ्या कार्यालयात तेजस मोरे (Tejas More) याचा जामीन अर्ज (Bail application) होता त्याचा या कटात सहभाग असल्याची दाट शक्यता आहे. माझ्या कार्यालयात त्याने घड्याळ आणून लावलं होतं. त्याची फी सुद्धा अद्याप बाकी आहे. तो माझा अशील होता. तेजस जेलमध्ये असताना त्याची ओळख चाचू नावाच्या कैदीसोबत झाली होती. तो चाचू येथे आल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. तो आता नांदेडला पळून गेला असल्याचं प्रवीण चव्हाण (Advocate Praveen Chavan) यांनी सांगितलं.

 

स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठे साहेब म्हणून जो उल्लेख आहे त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
मी जास्तीत जास्त संवेदनशील केसवर (Sensitive case) काम करत असतो.
त्यातील प्रत्येक आरोपीला जामीन मिळाला नाही.
वकील आहे तोपर्यंत आपला जामीन काही होत नाही त्यामुळे यालाच बाजूला केलं तर अशी आरोपींची भावना असल्याचं प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, आजच्या काळात आवाजाचं आणि व्हिडीओ सुद्धा मॅनिप्युलेट करता येतं.
दुसरं म्हणजे व्हिडीओ कट केलेले आहे. याचा अर्थ असा होतो की याआधीचा मजकुर लपवलेला असू शकतो,
असा दावा प्रवीण चव्हाण यांनी केला आहे.
एकंदरित आता या व्हिडीओची सत्यता बाहेर येत नाही तोपर्यंत कोणताही अंदाज लावता येऊ शकत नाही.

 

Web Title :- Advocate Praveen Chavan | BJP leader devendra fadnavis pen drive sting operation who put hidden camera in office watch advocate pravin chavan gives answer

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘एकच वादा अजित दादा’ ! रविवारी अजित पवार यांच्याकडून पुण्यात उद्घाटनांचा धुमधडाका, एकाच दिवशी 31 उद्घाटन; जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक

Pune Crime | व्याजाने दिलेले पैसे न दिल्याने तरुणाचे भोसरीतून अपहरण; हवेली पोलिसांनी सराईत गुंडासह दोघांना घेतले ताब्यात

Kidney Disease Symptoms | ‘हे’ संकेत सांगतात की किडनी होतेय खराब, लक्षणे दिसताच सर्वप्रथम करा ‘हे’ काम; जाणून घ्या

 

Related Posts