IMPIMP

Ajit Pawar | ‘साहेबांसमोर सांगतो, मला विक्रम काळेची भीतीच वाटते’, असं का म्हणाले अजित पवार

by nagesh
Ajit Pawar - Sharad Pawar Birthday | ncp leader ajit pawars guidance speech to the activist leaders on the birthday of ncp president sharad pawar

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइनराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या समोर आमदार विक्रम काळे (MLA Vikram Kale) यांची भीतीच वाटत असल्याचे मत व्यक्त केलं. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) विक्रम काळे यांनी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील (BJP MLA Chandrakant Patil) यांचे उदाहरण दिल्याचेही आवर्जून सांगितले. ते आज (मंगळवार) औरंगाबादमध्ये (Aurangabad) बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, साहेबांसमोर सांगतो मला विक्रम काळे यांचा कार्यक्रम घेताना मनात भीतीच असते. कारण कार्यक्रमाला बोलावून भर कार्यक्रमात काय मागेल याचा अंदाज बांधू शकत नाही. मी खोटं सांगत नाही. त्यांनी मागच्या वर्षी माझी बहिण खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) हिला बोलावलं. तिच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम सतीश चव्हाण (Satish Chavan) यांच्या सत्काराचा होता. त्या कार्यक्रमात मी तीन टर्म आमदार म्हणून निवडून आलोय. मला मंत्री करा अशी थेट मागणीच त्यांनी करुन टाकली.

 

विक्रम काळे म्हणाले, भाजपात आमदार चंद्रकांत पाटील पहिल्या टर्ममध्ये आमदार होतात आणि मंत्री होतात आणि मला तीन टर्मला मंत्री करत नाही. उदाहरण पण चंद्रकांत पाटलांचे दिले. सतिश चव्हाण म्हणाले, कार्यक्रम माझा होता, माझं दिलं सोडून विक्रम स्वत:च मागत बसला. हे असला विक्रम. त्यामुळे मी इतकं दबकत दबकत आलो की काही न सांगितलेले बरे असे अजित पवार म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

…तर विक्रम काळेचा नंबर कटला असता
अजित पवार पुढे म्हणाले, विक्रम काळे यांना नंतर लक्षात आले की सतीश चव्हाण हे शेजारी बसले आहेत.
तेव्हा मंत्रिपद एकट्यासाठी मागणं योग्य दिसणार नाही, त्यांना काय वाटेल. म्हणून मग सतिश चव्हाण वरिष्ठ आहेत त्यांनाही मंत्री करा अशी मागणी केली.
एकालाच मंत्री करायचं ठरवलं तर सतिश चव्हाण यांचा नंबर लागतो. त्यामुळे दोघांनाही मंत्री करा असं सांगून टाकलं.
कारण एकाला म्हटलं असतं तर विक्रम काळे यांचा नंबर कटला असता.
अशा पद्धतीचा हा आमचा विक्रम, असे नमूद करताच सभागृहात एकच हशा पिकला.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar comment on ncp mla vikram kale in front of sharad pawar in aurangabad

 

हे देखील वाचा :

MP Navneet Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ ! मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणे महागात पडणार?

Shivsena Leader Deepali Sayed | ‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरीही ती फोडली असती, हे बाळासाहेबांचे शिवसैनिक’

Mango Seeds Health Benefits | चुकूनही फेकू नका आंब्याचे बाटे, Cholesterol सारखे 5 गंभीर आजार होतील दूर; जाणून घ्या कसा करावा वापर

 

Related Posts