IMPIMP

Shivsena Leader Deepali Sayed | ‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरीही ती फोडली असती, हे बाळासाहेबांचे शिवसैनिक’

by nagesh
Deepali Sayed | shivsena thackeray faction deepali sayyed on joining eknath shinde faction

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena Leader Deepali Sayed | खार पोलिस ठाण्यात (Khar Police Station) राणा दाम्पत्यांना भेटण्यासाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याप्रकरणी शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Shivsena Leader Deepali Sayed) यांनी शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचे समर्थन केले आहे. ‘सोमय्या काय त्या कारमध्ये मोदी जरी असते तरी शिवसैनिकांनी कार फोडली असती,’ असं वक्तव्य सय्यद यांनी केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

खोपोली (Khopoli) येथे एका कार्यक्रमात बोलताना दिपाली सय्यद (Shivsena Leader Deepali Sayed) म्हणाल्या की, ”जेव्हा ही घटना घडली त्या परिस्थितीवेळी प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर होता आणि हे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांची शिकवण आहे जो नडला त्याला फोडला. जर तिथं त्या कारमध्ये जर मोदीही असले ना तर त्या कारला तसेच फोडले असते. तुम्ही तिथं जाणार या सगळ्या गोष्टी घडणार पण तुम्ही हे केलंच कशाला,’ असं त्या म्हणाल्या.

 

पुढे दिपाली सय्यद यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. ”न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody)
तुम्हाला काय फाइव्ह स्टार हाॅटेलची ट्रीटमेंट मिळत नाही हे त्यांनी आधी समजून घ्यायला पाहिजे.
तुमच्यावर गुन्हा दाखल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजद्रोही गुन्हा दाखल आहे.
तुम्हाला तिथं नेलं आहे आणि तुम्ही म्हणत असाल मला फाइव्ह स्टारची थाळी आणून द्या.
मला गुलाबजाम खायला घाला, तर तसं होत नाही. जी बाकीच्या लोकांना केली जाते तिच शिक्षा तुम्हालाही केली गेलीय”, असं सय्यद यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Shivsena Leader Deepali Sayed | even if modi was in that car shiv sena supporters gives the same reply says deepali sayed

 

हे देखील वाचा :

Mango Seeds Health Benefits | चुकूनही फेकू नका आंब्याचे बाटे, Cholesterol सारखे 5 गंभीर आजार होतील दूर; जाणून घ्या कसा करावा वापर

WhatsApp Group Voice Call New Feature | आता तब्बल 32 लोकांशी एकाच वेळी करू शकता ‘ग्रुप व्हॉईस कॉल’

Sanjay Raut | नवनीत राणांच्या आरोपांना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे ट्विट करुन प्रत्युत्तर; शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले…

 

Related Posts