IMPIMP

Ajit Pawar | CM उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडे बोलून दाखवली नाराजी; अजित पवार म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar has reacted after cm uddhav thackeray expressed his displeasure over ncp towards sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) काही कारणावरुन सतत कुजबूज पाहायला मिळते. त्यामुळे सरकारमधील तिन्ही पक्षांची कोणत्याही मुद्यावर नाराजी दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेस पक्षाचे (Congress) 25 आमदार नाराज आहेत. तर दुसरीकडे शिवसेना (Shiv Sena) राष्ट्रवादीच्या (NCP) भूमिकेवर समाधानी नसल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. भाजपविरोधात शिवसेना जोरदार आक्रमक झाली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी नरमाईची भूमिका घेत असल्यानं शिवसेनेतुन नाराजी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) ही नाराजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे (Sharad Pawar) बोलून दाखवल्याचं कळते. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, की ”शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील. आम्ही एकटे काम करत नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींनी मिळून ही महाविकास आघाडी तयार केली आहे. त्याबद्दल सर्व मिळून निर्णय घेतील. काम करताना एकमेकाला मदत कशी होईल हाच प्रयत्न असतो,” असं अजित पवार म्हणाले.

 

राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपा (BJP) विरोधात आक्रमक पवित्रा घेत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितलं. महाविकास आघाडीने आक्रमकपणे भाजपचा सामना करावा असं खुद्द शरद पवारांचं मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीचे परिणाम आगामी काही दिवसांमध्ये दिसतील, अशी आशा शिवसेना नेत्याकडून व्यक्त केली जातेय.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्यानं म्हटलं आहे की, भाजप विरोधातील लढाई आम्हीच लढत आहोत.
शिवसेनेचे नेते आणि शिवसैनिक फ्रंटफूटवर आहेत.
पण राष्ट्रवादी बॅकफूटवर आहे. राष्ट्रवादीनं ज्याप्रकारे भाजपाशी दोन हात करायला हवेत, तसे त्यांच्याकडून होताना दिसत नाही.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar has reacted after cm uddhav thackeray expressed his displeasure over ncp towards sharad pawar

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचा आलेख चढाच ! दररोज होतेय 84 पैशांनी वाढ, व्यावसायिकांचे गणित कोलमडले

PMPML | पुणेकरांसाठी खूशखबर ! पीएमपीचे तिकीट आता मोबाइल ॲपद्वारे काढता येणार

 

Related Posts