IMPIMP

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचा आलेख चढाच ! दररोज होतेय 84 पैशांनी वाढ, व्यावसायिकांचे गणित कोलमडले

by nagesh
Maharashtra Petrol-Diesel Price | maharashtra petrol diesel price 15th july 2022 check latest rate full list mumbai pune nashik nagpur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Petrol Diesel Price Hike Pune | केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच इंधन दरातील भाववाढीचे समर्थन केल्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलमधील भाववाढ सातत्याने सुरुच ठेवली असून त्यांच्यावर आता कोणाचेच नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Petrol Diesel Price Hike Pune)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पेट्रोलच्या दरात आज पुन्हा लिटरमागे ८४ पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचा दर आता ११६.२० प्रति लिटर झाले आहे.
पॉवर पेट्रोलच्या किंमतीत लिटरमागे ८३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता १२०.७० रुपये लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरातही प्रति लिटर ८३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात डिझेलचा दर ९८.९४ रुपये झाला आहे. (Petrol Diesel Price Hike Pune)

राज्यातील अनेक शहरात डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. पेट्रोल, डिझेलची दररोज होणारी दरवाढ लक्षात घेता डिझेलचे दर २ एप्रिल रोजी पुण्यात शंभरी पार करेल. या अगोदर १६ ऑक्टोंबर २०२१ रोजी पुण्यात डिझेलचा दर १००.०८रुपये लिटर झाला होता. तो ३ नोव्हेंबरला१०४.४६ रुपये लिटर झाला होता. त्याचवेळी पेट्रोल ११५.३३ रुपये लिटर होते. त्यानंतर दिवाळीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कर कमी केल्याने ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पेट्रोल १०९.५० रुपये व डिझेल ९२.५० रुपये लिटर झाला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलचे दर (Crude Oil Price) कितीही वाढले तरी चार राज्यातील निवडणुकामुळे तेल कंपन्यांना देशातील इंधनाचे दर वाढविण्यावर निर्बंध घातले होते. या निवडणुक काळात झालेला तोटा भरुन काढण्यासाठी आता दररोज वेगाने पेट्रोल, डिझेलचे दर वाढविले जात आहे.

 

 

web title :  Petrol Diesel Price Hike Pune | Petrol, diesel price hike graph goes up! An increase of 84 paise per day, the maths of the professionals collapsed

 

हे देखील वाचा :

PMPML | पुणेकरांसाठी खूशखबर ! पीएमपीचे तिकीट आता मोबाइल ॲपद्वारे काढता येणार

Pune Crime | शारीरीक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ! विमाननगर परिसरातील रो हाऊस विकायला लावून महिलेचे केले आर्थिक शोषण; वडिलांच्या मित्रानेच दाखवलं काम

Pune Crime | पिंपरीतील संतापजनक घटना ! शिक्षकाकडून नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 

Related Posts