IMPIMP

Ajit Pawar | आगामी निवडणुकीत आघाडीची वाट पाहात बसू नका, एकटे लढण्याची तयारी करा; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सूचक सल्ला

by nagesh
Ajit Pawar | balasaheb thackeray birth anniversary ncp ajit pawar on balasaheb painting in vidhan bhavan

शिर्डी : सरकारसत्ता ऑनलाईन   राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे शिर्डीमध्ये दोन दिवसीय मंथन शिबिराला सुरुवात झाली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या
कार्यकर्त्यांना सावधगिरीचे सल्ले देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नाव न घेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका
केली. पक्ष बदलणे चूक नाही. आपला पक्ष बदलून वेगळे होऊन मुख्यमंत्री होणे गैर नाही, पण ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे ही बेईमानी आहे,
असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Election) तुम्ही एकटे लढायचे यासाठी
तयारी करा. आपली ताकद असेल तर मित्र पक्ष चर्चा करतील, असेही अजित पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कार्यकर्त्यांना सावधगिरीचा सल्ला देताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत, आपल्या लोकांना ही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले त्यांना आता पश्चाताप होत आहे, त्यांना वाटत जे केलं ती चूक झाली. ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे योग्य नाही. शिवसेनेबाबत (Shivsena) जे घडले, नाव गेले हे महाराष्ट्रातील जनतेला आवडले नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

आघाडीचा वाट पाहत बसू नका
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीची (Aghadi) वाट पाहत बसू नका तो लवकरच होईल मात्र तुम्ही कामाला लागा.
आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा.
आपली ताकद स्थानिक पातळीवर दिसली तरच मित्र पक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील, असं देखील अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्तेत कशी येईल हे बघितलं पाहिजे.
त्यासाठी पक्ष मजबूत केला पाहिजे. यासाठी कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on maha vikas aghadi upcoming election and allegation on eknath shinde at ncp shirdi political news

 

हे देखील वाचा :

Sushma Andhare | अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनावरुन सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या- ‘सरकार उलथवून टाकण्यासाठीच…’

Pune Traffic Jam Problem | वाहतूक कोंडीवरून होणारी टीका दोन्ही आयुक्तांनी घेतली मनावर ! मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांनी रस्त्यांची संयुक्त पाहाणी करून सुचविल्या ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

Pune Crime | 5 पट पैसे परत केल्यानंतरही घरात शिरुन धमकाविणारा सावकार नागराज उर्फ नागेश नायकोडी अटकेत

 

Related Posts