IMPIMP

Ajit Pawar | मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका; म्हणाले, ‘एक देखील…’

by nagesh
Maharashtra Politics News | 'Make Ajit Pawar Chief Minister', leader's direct offer to Ajit Pawar

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्यांवरून चांगलेच तापलेले असताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) आज विधिमंडळात बोलताना विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना सुनावले. त्यांनी महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग तसेच विद्यमान सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार यावर प्रामुख्याने भाष्य केले. एकदाचा काय तो दिल्लीला फोन करा आणि तुम्हाला कोणाला घ्यायचे आहे त्याला घ्या आणि मंत्रीमंडळ विस्तार करा. असा टोला त्यांनी (Ajit Pawar) यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांना लगावला. स्वतःकडे जास्त खाती ठेवून चंद्रकांत पाटील यांना बाजूला करण्यावरूनही त्यांनी देवेद्र फडणवीसांना टोला लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, भाजपमधील अनेक मंत्री देवेंद्रजींना विचारलं पाहिजे म्हणतात, शिंदे गटातील मंत्र्यांचा सवतासुभा असतो, त्यांना काही अडचण नाही, पण हे सगळ करत असताना आपल्या राज्यात ही पद्धत नव्हती. प्रत्येक कामासाठी आपल्याकडे जायला लागणं हे बरोबर नाही. आपल्या दोघांचे, तर चांगलं चाललं आहे. देवेंद्रजींना विचारलं की, मुख्यमंत्र्यांची संमती आणा आणि त्यांना विचारलं की ते म्हणतात देवेंद्रजींनी म्हटल्यास मी केलं. ही टोलवाटोलवी सुरु आहे. दादा तुमची मला इतकी कधी कधी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती, तर अशी टोलवाटोलवी केली नसती. कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला केवळ एक दोन साधी विभाग देऊन बाजूला ठेवलं आहे आणि स्वत: महत्वाची सहा सहा विभाग घेतले आणि या पद्धतीचे राजकारण करता? बरोबर अक्षरश: तळतळाट लागेल तुम्हाला. अशा मिश्कील शैलीत अजित पवारांनी फडणवीसांची कानउघडणी केली.

 

तसेच यावर बोलताना पुढे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि 18 मंत्री सभागृहात आहेत, पण एकही महिला मंत्री नाही ही किती मोठी नामुष्की आहे, हा महिलांचा अपमान आहे. रात्री लावा फोन दिल्लीला आणि उद्या करा मंत्रिमंडळ विस्तार. पहिल्यांदा आपण दोघांनी चालवलं, नंतर वाढवले, पण अजून 22-23 लोक घेता येतात. ज्यांना कोणाला संधी द्यायची त्याला द्या, पण एक दोन विभाग द्या, पण विस्तार करा. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या वक्तव्यांनी सभागृहात चांगलाच हाशा पिकला.

 

त्यापुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, सहकार मंत्र्यांकडे काम आणल्यास देवेंद्रजींना
विचारतो म्हणतात, पण त्यांच्याकडे सहा खात्यांचा कारभार आहे आणि भार कशासाठी टाकता?
त्यांच्याकडे सहा पालकमंत्रीपद आहेत. ते कतृत्ववान आहेत, पण सहा पालकमंत्री नेमल्यास जास्त काम होणार नाही का? आपण महिलांबाबत बोलत असता, पण सहा महिन्यात एक महिला मंत्री करण्यासाठी सापडली नाही का? मी आता अमृता वहिंनींना सांगतो जरा बघा यांच्याकडे, त्यांनी सांगितल्यास लगेच होऊन जाईल.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar take a jibe on devendra fadnavis over cabinet expansion

 

हे देखील वाचा :

PAN- Aadhaar Link | तुमवे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक आहे का?, जाणून घ्या हे तपासण्याची सोपी पद्धत

Pune Fire | पुणे कॅम्प भागातील अनाथलयात आग, मध्यरात्रीची घटना; 100 मुलांची सुखरुप सुटका

HDFC Bank ने फिक्स्ड डिपॉझिटवर वाढवला इंटरेस्ट रेट, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स

 

Related Posts