IMPIMP

Ajit Pawar | ‘देहूमधील कार्यक्रमाबद्दल मला काहीच बोलायचे नाही’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

by nagesh
 Ajit Pawar | ajit pawar said take revenge of uddhav thackeray by defeating eknath shinde and bjp in kasba chinchwad by election

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइनदेहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Dehu Visit) यांच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना न बोलू दिल्याचा प्रकार घडला होता. मात्र, आता या प्रकरणावर मला काहीही बोलायचे नाही. पंतप्रधान आता दिल्लीत पोहोचले आहेत. कार्यक्रम चांगला झाला होता, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ते बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election 2022) आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत (Vidhan Parishad Election) भाष्य केलं. यावेळी देहूमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाषण करुन दिले नाही, या प्रकरणावर त्यांनी पहिल्यांदाच आपली बाजू मांडली.

 

अजित पवार म्हणाले, देहूमधील कार्यक्रमाबद्दल मला काही बोलायचं नाही. हा कार्यक्रम होऊन बरेच दिवस झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दिल्लीत पोहचले आहेत. देहुत अतिशय चांगला कार्यक्रम झाला. देहू वारकरी संप्रदायातील अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. मोठ्या प्रमाणात वारकरी त्या ठिकाणी आले होते. पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी सर्व पाहणी केली होती.

 

तसेच अजित पवार यांना भाजपसोबत येण्याचे निमंत्रण विखे पाटील (Vikhe Patil) यांनी दिले होते. याबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, आमचं इथं बरं चाललं आहे. कोणी काय वक्तव्य करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी विखे पाटलांचे निमंत्रण धुडकावून लावले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर कळेल कोणाकडे…

विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
आधी देखील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती.
प्रत्येक पक्षाचा उमेदवार निवडून आणणे ही त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे.
निवडणुकीत जो जिंकतो त्याच्याकडे कौशल्य असते असं म्हटलं जातं.
विधानपरिषद निवडणुकीनंतर कळेल कोणाकडे कौशल्य आहे आणि कोणाकडे काय आहे, असेही अजित पवार म्हणाले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar spoke for the first time on the issue of denial of speech in prime minister modis program dehu

 

हे देखील वाचा :

Nitin Gadkari | नितीन गडकरींची मोठी घोषणा ! चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या गाडीचा फोटो काढा आणि 500 रुपये मिळवा

Devendra Fadnavis | ‘पंतप्रधान मोदी-अजितदादांच्या मनमोकळ्या गप्पा, राष्ट्रवादीला बघवलं नाही’ – देवेंद्र फडणवीस

Ketaki Chitale Bail | अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर; पण मुक्काम…

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह कमेंट; बार्शीतल्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

 

Related Posts