IMPIMP

Ajit Pawar on Raj Thackeray | ‘कुणी अल्टिमेटम देऊन जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर…’; अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा !

by nagesh
Ajit Pawar | ncp ajit pawar mocks mns raj thackeray on sharad pawar cast politics in maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar on Raj Thackeray | महाराष्ट्र दिनी सभा घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला 4 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत असून याच पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना इशारा दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज ठाकरे यांनी काल केलेल्या भाषणामध्ये मागील भाषण रिपीट केलं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं कारण पवारांचं नाव घेतल्यावर प्रसिद्धी मिळते. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य असून कोणाचीही हुकूमशाही (Dictatorship) चालणार नाही. कायद्याने, संविधानाने (Constitution) सांगितलेल्या नियमांंचं सर्वांना पालन करावं लागणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

 

कुणी अल्टिमेटम देत असेल आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर पोलीस यंत्रणा (Police Department) त्यांचं काम करेल.
कुणाच्या भाषणातून जातीय द्वेष पसरवला जात असेल तर हे महाराष्ट्राला परवडणारं नाही.
घरात बसून बोलायला काय जातं, केसेस तर कार्यकर्त्यांवर दाखल होतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, लोकसभेवेळी (Lok Sabha) ते भाजपविरोधात बोलत होते त्यानंतर त्यांचं मत परिवर्तन झालं त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेविरोधात बोलायला सुरूवात केली असल्याचं पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar On Raj Thackeray | dcm ajit pawar warn mns raj thackeray over mosque loudspeaker sound issue

 

हे देखील वाचा :

MP Navneet Rana and MLA Ravi Rana | राणा दाम्पत्याच्या अडचणीत प्रचंड वाढ, कोठडीतील मुक्काम वाढला

Imtiyaz Jaleel on Sharad Pawar | ‘शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा’; इम्तियाज जलील यांचा पवारांवर निशाणा !

Pune Crime | वाहनचोरी करणारा अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts