IMPIMP

Ajit Pawar On Shriniwas Pawar | सख्खा भाऊ विरोधात का गेला, अजित पवारांनीच सांगून टाकलं श्रीनिवास पवार काय म्हणाले होते, तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो

by sachinsitapure

पुणे : Ajit Pawar On Shriniwas Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) महायुतीकडून (Mahayuti) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत संपूर्ण पवार कुटुंबिय सुप्रिया सुळेंच्या बाजूने आणि अजित पवारांच्याविरोधात प्रचार करत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे सख्खे मोठे बंधू श्रीनिवास पवार, त्यांची पत्नी आणि मुलगासुद्धा सुनेत्रा पवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत. सख्खा भाऊ विरोधात का गेला, याबाबत आता अजित पवारांनी मोठा खुलासा केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

श्रीनिवास पवार यांच्याबाबत अजित पवार म्हणाले, श्रीनिवास पवारांनी मला सांगितले होते की मी तुझ्यासोबत राहीन, पण तू उमेदवार बदल. मी तुझ्यासोबत राहीन. माझे असे म्हणणे आहे की, राजकाराणामध्ये आम्ही लोक आहोत.

कुणाला तिकीट द्यायचे याचा निर्णय आम्ही घेऊ. पण त्यांनी मला दोन-तीन वेळा सांगितले की उमेदवार बदल मी उद्यापासून तुझे काम करेन. त्याचा अर्थ मला कळला नाही म्हणून मी त्याला विचारले. तो म्हणाला बाकी मला काही विचारू नको मला तुला एवढेच सांगायचे आहे, असा खुलासा अजित पवार यांनी केला.

शरद पवार यांनी केलेल्या बाहेरचे पवार, या टीकेवर अजित पवार म्हणाले, तुम्ही स्वतःला पुरोगामी समजता, महिलांच्या बद्दल बरेच काही बोलता आणि एकीकडे चाळीस वर्षे घरात असलेल्या सूनेला बाहेरची समजता. याच्यावरुन लोकांना काय समजायचे ते लोक समजले आहेत.

हा एकप्रकारे सगळ्या सुनांचा अपमान आहे. बाहेरची म्हणत असताना आजूबाजूला खिदळणाऱ्यांनाही त्यांच्याही घरात सून असेल याचे तारतम्य नव्हते. हे कशाचे द्योतक आहे. सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात यामुळे पाणी आले, असे म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Pune Crime News | पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकारात हाणामारी, पत्रकारावर FIR

Related Posts