IMPIMP

Pune Crime News | पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि पत्रकारात हाणामारी, पत्रकारावर FIR

by sachinsitapure

पुणे : – Pune Crime News | पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्ता (RTI Activist Pune) आणि पत्रकारात (Journalist) यांच्यात हाणामारी झाली. पत्रकाराने मारहाण करत माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दात पाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पत्रकारावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.25) दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा परिषद मधील पहिल्या मजल्यावरील पार्कींगमध्ये घडला आहे.

याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते भैय्यासाहेब जगन्नाथ शिंदे (वय-52 रा. मु.पो. वरकुटे बुद्रुक, लोणी देवकर ता. इंदापुर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन पत्रकार राहुल बानगुडे (Rahul Bangude) यांच्यावर आयपीसी 323, 325, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे आरटीआय आर्यकर्ते आहेत. फिर्य़ादी जिल्हा परिषद ऑफिसमधून माहिती अधिकारात माहिती मागवण्यासाठी अर्ज घेऊन आले होते. जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या पार्कींगमध्ये आरोपी राहुल बानगुडे यांनी फिर्यादी यांच्याकडे अर्जाची प्रत मागितली. मात्र, फिर्य़ादी यांनी अर्जाची प्रत देण्यास नकार दिला.

याचा राग आल्याने राहुल बानगुडे यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच खोट्या तक्रारी करुन गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. यावेळी झालेल्या झटापटीत राहुल बानगुडे यांनी शिंदे यांच्या तोंडावर जोरात बुक्की मारली. यामध्ये शिंदे यांचे पुढील एक दात पडल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी राहुल बानगुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ करीत आहेत.

Arun Gawli | कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ लवकरच येणार बाहेर? हायकोर्टाचे राज्य सरकारला ‘हे’ आदेश

Related Posts