IMPIMP

Ajit Pawar | ‘लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे’

by nagesh
Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | ajit pawar reaction on eknath shinde uddhav thackeray shivsena dussehra melawa controversy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुण्यात आले होते. कोरोनाच्या आढावा बेठकीनंतर बोलताना पुणे आणि पिंपरी परिसरातील नागरिकांनी नियम पाळण्याच्या आणि दुसरा डोस लवकरात लवकर घेण्याच्या सुचना केल्या आहेत. दरम्यान, वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत 4 महिन्यांच्या बालकाचा आणि नंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. यावरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर (Mayor Kishori Pednekar) भाजप नेते (BJP) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. यावरुन अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

त्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. ‘लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, महिलांचा आदर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मुंबईच्या महापौर या प्रथम नागरिक महिला हे अत्यंत महत्त्वाचे पद त्यांच्याकडे आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले म्हणूनच त्यांनी तक्रार केली आहे.

पुढे अजित पवार म्हणाले, ‘एसटी संपाच्या बाबतीत लोक काही वक्तव्य करत होते. लोकांनी आता बोलताना तारतम्य बाळगणे सोडले आहे. अशा वक्तव्यांमुळे समाजातही तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. कोणीही असो लोकांसमोर व्यवस्थितच बोलता आले पाहिजे. राष्ट्रवादीचे नेते अथवा अजून कोणीही असो असे वक्तव्य करू नये.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, वरळी येथील 30 नोव्हेंबरला बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीररित्या जखमी झाले होते.
त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी 4 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.
तसेच, आईचेही सोमवारी निधन झाले. या घटनेवरुन आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘सिलिंडर स्फोटात 72 तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात’ असं वक्तव्य केले होते.
यावरुन शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झालेली पाहायला मिळालं.

 

Web Title :- Ajit Pawar | people should be discriminating when making certain statements said ajit pawar in pune

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा एक संधी, अनिल परब यांनी केली मोठी घोषणा

नोकरी बदलल्यानंतर EPFO मध्ये नोंदवली नाही Date of Exit, तर स्वत: करू शकता अपडेट; जाणून घ्या प्रोसेस

Kolhapur News | मालवणच्या समुद्रात बुडणाऱ्या कोल्हापूरच्या 33 वर्षीय तरुणीला मिळालं जीवदान

 

Related Posts