IMPIMP

Kolhapur News | मालवणच्या समुद्रात बुडणाऱ्या कोल्हापूरच्या 33 वर्षीय तरुणीला मिळालं जीवदान

by nagesh
Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Kolhapur News | मालवण (Malwan) तालुक्यातील तळाशील येथील समुद्रात (Sea) बुडणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणीला ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवदान दिले. गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला. तरुणीला समुद्रातून बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी संबंधित तरुणीकडे चौकशी केली असता ती कोल्हापूरची (Kolhapur News) असल्याचे समोर आले. तरुणीच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तळाशील येथील समुद्राच्या पाण्यात ३३ वर्षीय तरुणी उतरल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले होते. तिच्या सर्व हालचाली संशयास्पद वाटत होत्या. दरम्यान काही ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या तरुणीला पाण्यातून बाहेर काढले. गावकऱ्यांनी तरुणीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. प्राथमिक तपासात ही तरुणी कोल्हापूरची (Kolhapur News) रहिवासी आहे. मालवण येथून ती एका रिक्षाने तळाशील येथे आली. रिक्षातून उतरल्यानंतर ती थेट समुद्राच्या पाण्यात उतरली होती. दरम्यान, संबंधित तरुणी समुद्राच्या पाण्यात नेमक्या कोणत्या उद्देशाने उतरली होती, याची कोणतीही माहिती समोर आली नाही. मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Web Title :- Kolhapur News | 33 years old woman from kolhapur enters in sea at talashil malwan villagers saved her life

 

हे देखील वाचा :

SBI Customers Alert | उद्या बंद राहतील एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ! योनो लाईट, युपीआय सेवा

Keshav Upadhye | केशव उपाध्ये यांचा खा. सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाले – ‘ताई, मन मोठं करा, हा सल्ला अजित पवारांना द्या’

Shirdi Crime | शिर्डीत गोळीबाराचा थरार ! भल्या पहाटे तरुणावर झाडल्या गोळ्या; शिर्डीत खळबळ

 

Related Posts