IMPIMP

Ambadas Danve | ‘…हाच आमच्या शिवसेनेचा नैतिक विजय’, अमित शहांच्या दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका

by nagesh
Maharashtra Politics Issue | | ambadas danve comment on maharashtra political crisis next hearing on 14th feb

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबई महानगरपालिका निवडणुका (Brihanmumbai Municipal Corporation Election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या (BMC) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे गणेश उत्सवाचे औचित्य साधून मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी भाजप (BJP) नेत्यांची बैठक घेऊन धोका देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी यावे लागते हाच आमच्या शिवसेनेसाठी नैतिक विजय असल्याचा टोला अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी लगावला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विधान परिषदेत (Legislative Council) विरोधी पक्षनेते (Opposition Leader) झाल्यानंतर ते पहिल्यांदा पुण्यात आले होते. गणेशोत्सवानिमित्त अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुणे शहरातील काही प्रमुख गणेश मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबई महापालिकेतील आमचा विजय हा दैदिप्यमान असेल. शिवसेना फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करतो, असे दानवे म्हणाले. त्यामुळे आमचा मुंबईत विजय होईल, दरम्यान, दानवे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

 

दडपशाहीला घाबरत नाही

यावेळी अंबादास दानवे यांनी उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत भाष्य केले.
उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला झाला, असे सांगण्यात आले होते.
त्यावेळी अनेकांना अटक करण्यात आली.
परंतु या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही, असे दानवे म्हणाले.
तसेच शिवसेना ही जमिनीवर असून ते आकाशात आहेत.
आम्ही त्यांना चांगले आकाश दाखवू, असेही दानवे म्हणाले.

 

Web Title :- Ambadas Danve | amit shah union home minister ambadas danve municipal elections mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मंचर व चाकण येथील मिठाई विक्रेत्यांवर FDA कडून कारवाई, 119 किलो खावा जप्त

PPF अकाउंटवर सुद्धा घेऊ शकता लोन, जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी

Patanjali Share | बाबा रामदेव यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात 5400% दिला रिटर्न

 

Related Posts