IMPIMP

Amit Shah | शिवरायांनी केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर देशाच्या दोन तृतीयांश भागावर राज्य केलं – अमित शाह

by nagesh
Uddhav Thackeray On Amit Shah | cm uddhav thackeray attacks amit shah in mumbai

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनकर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यात (Pune) शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन केले. यावेळी शिवाजी महाराज यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या दोन तृतीयांश भागावर राज्य केलं. त्यांनी हिंदवी स्वराज्याची (Hindavi Swarajya) स्थापना केली, असं म्हणत अमित शाह (Amit Shah) यांनी आपली भूमिका मांडली. तसेच आंबेडकरांनी दिलेलं संविधान (Constitution) जगभरातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. पण आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने (Congress) सोडली नसल्याची टीका त्यांनी केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुण्यात अमित शाह (Amit Shah) यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावर झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी अमित शाह यांनी कर्नाटक घटनेसंदर्भात भाष्य केले.

 

अमित शाह म्हणाले, बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा संकल्प केला आहे. शिवाजी महाराजांची ही भव्य प्रतिमा तरुणांना विचार आणि प्रेरणा देत राहील. जेव्हा अंधार दाटलेला होता, स्वराज्य हा शब्द उच्चारण अशक्य होतं. तेंव्हा एक तरुण उठतो आणि स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा करतो आणि केवळ महाराष्ट्र (Maharashtra) नाही तर देशाच्या दोन तृतीयांश भागावर राज्य केलं. हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. अष्टप्रधान मंडळाद्वारे प्रशासन राबवण्याचे काम केले, पहिलं आरमार आणि सेना उभी केली, असं अमित शाह यांनी म्हटले.

संविधान लिहिण्यात बाबासाहेबांचा मोठा वाटा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं देशाचं संविधान लिहिण्यात मोठा वाटा आहे.
देशातल्या मागासलेल्या लोकांसाठी संविधान लिहून उद्धार केला. प्रचंड अपमान कटुता झेलून ही ती संविधानात उमटू दिली नाही.
आंबेडकरांनी दिलेले संविधान जगभरातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे.
पण आंबडकरांना अपमानित करण्याची एक ही संधी काँग्रेस ने सोडली नसल्याची टीका त्यांनी केली.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुण्यात आलोय, पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकारने (Modi government) अनेक उपाय केले.
विमानतळासाठी (Airport) प्रयत्न केले पण काम थांबलंय. मोदींनी मेट्रोचं अनावरण केलं,
केंद्राने स्मार्ट सिटीसाठी (Smart City) 100 कोटी दिले. विस्टा ट्रेन (Vista Train) सुरु केली, 1000 बस दिल्या,
मुळा मुठासाठी 110 कोटी रुपयांचे काम सुरु आहे. सर्वाधिक स्टार्ट अप पुण्याचे काही आंतरराष्ट्रीय सुद्धा आहे.
पुण्याच्या अनेक विकास प्रकल्पाचं नियोजन सुरु असल्याचे शाह यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Amit Shah | union home minister amit shah on desecration of chhatrapati shivaji maharaj statue in bengaluru at pune

 

हे देखील वाचा :

Blood Sugar | आवळा आणि कोरफडीच्या सेवनाने कमी होऊ शकते ब्लड शुगर, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Rupali Chakankar | ‘हे संस्कार… माफी मागा नाहीतर…’, रुपाली चाकणकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा

India Post Payments Bank -IPPB | 1 जानेवारीपासून ‘या’ बँकेत 10,000 रुपयांपेक्षा जास्त जमा केल्यास लागेल चार्ज, जाणून घ्या किती पैसे होतील खर्च

 

Related Posts