IMPIMP

Blood Sugar | आवळा आणि कोरफडीच्या सेवनाने कमी होऊ शकते ब्लड शुगर, जाणून घ्या फायदे आणि तोटे

by nagesh
Aloe Vera For Weight Loss | aloe vera juice can drink in these 5 ways to lose weight

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Blood Sugar | सध्या जगभरात मधुमेहाच्या (Diabetes) समस्येने सर्वांनाच ग्रासले आहे. मानसिक ताण, शारीरिक श्रम आणि बदलती जीवनशैली ही मधुमेहाचे प्रमुख कारणे मानली गेली आहेत. म्हणूनच असे म्हटले जाते की माणसाने आपल्या जीवनशैलीसोबतच (Lifestyle) रोजच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. (Blood Sugar)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

एका अहवालानुसार, जगात मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण तरुणांमध्ये आढळून आले आहे. बदलते वातावरण आणि खाण्याच्या सवयींमुळे तरुण-तरुणी त्याला बळी पडत आहेत. स्वादुपिंड शरीरात इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन कमी करते किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा लोक मधुमेहाच्या विळख्यात सापडतात.

 

ब्लड शुगरवर नियंत्रण (Blood Sugar Control) ठेवण्यासाठी लोक औषधांसोबतच घरगुती उपायांचा अवलंब करतात. असाच एक घरगुती उपाय आहे ज्यामध्ये रोजच्या आहारात आवळा आणि कोरफडीचा समावेश करून तुम्ही मधुमेहावर बर्‍यापैकी नियंत्रण ठेवू शकता. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासोबतच हृदय, किडनी, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी ते प्रभावी आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

एलोवेरा किती फायदेशीर (How beneficial aloe vera) :
कोरफडमध्ये एसेमनन नावाचा घटक असतो, ज्याचा हायपोग्लायसेमिक (ग्लूकोज कमी करणारा) प्रभाव असतो. याशिवाय, कोरफडमध्ये हायड्रोफिलिक फायबर, ग्लुकोमनन आणि फायटोस्टेरॉल सारखी इतर अनेक संयुगे देखील असतात जी ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतात.

आवळ्याचे उपयोग (Use of amla) :

आवळा हे फळ शरीरातील इन्सुलिन सक्रिय करते.

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

हे नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते.

ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar) नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा रस हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

आवळ्यामध्ये पॉलीफेनॉल असतात जे ब्लड शुगरमुळे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

कसा करावा वापर :

आवळा पावडरसोबत कोरफड :

दोन्ही समान प्रमाणात घ्या आणि रिकाम्या पोटी सेवन करा.

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासह चयापचय वाढवण्यास मदत होते.

याशिवाय कोरफडीचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावा. प्रमाण थोडे असावे.

चव बदलण्यासाठी थोडा आवळा ज्यूस घेऊ शकता.

 

नुकसान :

कोरफडीचा खुप जास्त वापर अनेकदा शरीराचे नुकसान करतो. जसे की डायरिया, हायपोकॅलीमिया (पोटेशियमची कमतरता), किडनी फेलियर, फोटोटॉक्सिसिटी आणि हायपरसेन्सिटिव्ह रिअ‍ॅक्शन म्हणजे त्वचेसंबंधी अ‍ॅलर्जी, ज्यामध्ये त्वचेची जळजळ आणि इतर समस्या होऊ शकतात. कोणतेही घरगुती आयुर्वेदिक उपाय करण्यापुर्वी अगोदर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

 

Web Title :- Blood Sugar | blood sugar can be reduced by the consumption of amla and aloe vera know the advantages and disadvantages

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | ‘हे संस्कार… माफी मागा नाहीतर…’, रुपाली चाकणकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा

India Post Payments Bank -IPPB | 1 जानेवारीपासून ‘या’ बँकेत 10,000 रुपयांपेक्षा जास्त जमा केल्यास लागेल चार्ज, जाणून घ्या किती पैसे होतील खर्च

National Pension System (NPS) | ‘प्रायव्हेट नोकरी’मध्ये सुद्धा मिळवू शकता पेन्शन, निवृत्तीनंतर होणार नाही पैशांची अडचण; जाणून घ्या

 

Related Posts