IMPIMP

Amravati Violence | वादग्रस्त वक्तव्य करुन काड्या करु नये, संजय राऊतांनी साधला फडणवीसांवर ‘निशाणा’

by nagesh
Amravati Violence | shivsena mp sanjay raut verbal attack on bjp leader devendra fadnavis over amravati riots violence marathi news policenama

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी अमरावती हिंसाचारावरुन (Amravati Violence) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. अमरावती हिंसाचारावर (Amravati Violence) बोलताना फडणवीस यांनी वादग्रस्त व्यक्तव्य करुन काड्या करु नये, असे मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. हे ठाकरे सरकार (Thackeray government) आहे. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. याठिकाणी कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही, असे त्यांनी म्हटले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

संजय राऊत म्हणाले, हे ठाकरे सरकार आहे. येथे कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी आगीत तेल न टाकता अमरावती सारख्या (Amravati Violence) घटना घडू नयेत यासाठी शांत राहण्यासाठी काम केले पाहिजे. अमरावती सारख्या घटनांचं राजकारण, पेटवापेटवी महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा काही दंगलीसाठी ओळखला जाऊ नये, महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे.

 

दंगल कोणी पेटवली देशाला माहिती आहे

संजय राऊत पुढे म्हणाले, तुम्ही पाहिलं तर अमरावतीच्या शेजारी गडचिरोलीत (Gadchiroli) याच पोलिसांनी 26 नक्षलवाद्यांचा (Naxalites) खात्मा केला. कायद्यासमोर सगळे समान आहेत. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली, कोणत्या कारणामुळे पेटवली, यामगे होण होतं हे देशालाही माहित आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनाही (State Home Minister) माहिती आहे आणि अमरावतीमधील जनतेला देखील माहित आहे. वातावरण सगळं शांत झालं असताना उगाचच काड्या करण्याचं काम ना इकडल्यांनी, ना तिकडल्यांनी कोणीही करु नये एवढच मी महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) आवाहन करतो, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

कधी कधी इंटेलिजन्स फेल होतं

यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचे मान्य केलं.
ज्या दिवशी अमरावतीमध्ये हिंसक घटना (amravati riots violence) घडली तेव्हा जिल्हाधिकारी नव्हते, पोलीस नव्हते.
सरकारमधील काही मंत्र्यांनाच तस वाटतंय असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, कधी कधी इंटेलिजन्स फेल होतं.
शेवटी तेही माणसंच आहेत. देशभरात अनेक घटनांबाबत इंटेलिजन्स फेल होत असतं. काश्मीर, त्रिपुरामध्ये देखील होतं.
असं असलं तरी अमरावतीतील दंगल नियंत्रणात आणली. आज अमरावतीमध्ये शांतता नांदत असल्याचे राऊतांना सांगितले.

 

Web Title :- Amravati Violence | shivsena mp sanjay raut verbal attack on bjp leader devendra fadnavis over amravati riots violence marathi news policenama

 

हे देखील वाचा :

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान प्रकरणात एका तपास यंत्रणेचे थोबाड फुटले; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

High Court | प्रेमाचा अर्थ महिला शरीरसंबंधासाठी तयार असा आहे का? हायकोर्टाने सुनावला निर्णय

Parambir Singh | अखेर परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा समजला ! SC कडून माजी पोलिस आयुक्तांना दिलासा; सीबीआय आणि ठाकरे सरकारला नोटीस

 

Related Posts