IMPIMP

Parambir Singh | अखेर परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा समजला ! SC कडून माजी पोलिस आयुक्तांना दिलासा; सीबीआय आणि ठाकरे सरकारला नोटीस

by nagesh
Parambir Singh | supreme court grants param bir singh protection arrest ask him join probe notice to cbi and thackeray government also

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहेत. परमबीर सिंह नेमके कुठे आहेत? अशी चर्चा सुरु आहे. अखेर आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. परमबीर सिंह (Parambir Singh) भारताबाहेर गेले नसून, ते देशातच (country) आहेत, अशी माहिती (Information) त्यांच्या वकिलांनी आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दिली. तसेच पुढच्या 48 तासात सीबीआयसमोर (CBI) हजर होण्यास तयार आहे असे देखील त्यांनी न्यायालयाला सांगितले. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. अटकेपासून संरक्षण दिले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

परमबीर सिंह यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, परमबीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते समोर आलेले नाहीत. परमबीर सिंह (Parambir Singh) कुठे आहेत हे समजत नाही, तो पर्यंत खंडणी प्रकरणात (Ransom case) अटकेपासून संरक्षण दिले जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने मागच्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं. परमबीर सिंह चंदीगड (Chandigarh) येथे असल्याची त्यानंतर ते बेल्जियमला (Belgium) निघून गेल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

परमबीर सिंह देशात किंवा अन्य कुठे आहेत,
ते समजल्यानंतर याचिकेवर सुनावणी घेतली जाईल असे 18 नोव्हेंबरला न्यायाधीश संजय किशन कौल (Judge Sanjay Kishan Kaul) यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने (bench) स्पष्ट केलं होतं.
आमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत, तोपर्यंत कोणतीही सुनावणी होणार नाही, संरक्षण मिळणार नाही,
असे खंडपीठाने परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या वकिलांना सांगितले होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

बिमल अग्रवाल (Bimal Agarwal) यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
दोन हॉटेल्सविरोधात कारवाई करण्याची धमकी देऊन आपल्याकडून 11.92 लाख रुपये उकळले,
असा आरोप केला होता. दरम्यान, न्यायालयानं ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि CBI ला नोटिस देखील बजावली आहे.
आता याबाबतची पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे.

Web Title :- Parambir Singh | supreme court grants param bir singh protection arrest ask him join probe notice to cbi and thackeray government also

 

हे देखील वाचा :

Pradhan Mantri Jan Dhan Yojana | IIT च्या रिपोर्टमध्ये दावा – SBI ने आतापर्यंत परत केले नाहीत जन-धन खातेधारकांकडून वसूल केलेले 164 कोटी

Pune Crime | दारु अड्ड्यावर येणाऱ्या ग्राहकांना दिल्या शिव्या; मालकाने केला कामगाराचा खून, प्रचंड खळबळ

Pune Corporation | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटीचे ‘साऊंड’ चोरीला ! नगरसेवक सुभाष जगतापांचा डुप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवल्याचा गौप्यस्फोट

 

Related Posts