IMPIMP

Amrawati Crime News | बाईक अपघातात बापाच्या डोळ्यादेखत 20 वर्षीय मुलाचा मृत्यू; अमरावतीमधील घटना

by nagesh
 Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन  – Amrawati Crime News | अमरावतीमध्ये कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा
जागीच मृत्यू झाला तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास वलगाव ठाण्याच्या हद्दीतील चांदूरबाजार-
शिराळा या महामार्गावर घडला आहे. यश संजय गोटेकर (20) असे मृत मुलाचे तर संजय अजाबराव गोटेकर (53) असे या अपघातात जखमी झालेल्या
वडिलांचे नाव आहे. (Amrawati Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय घडले नेमके?

करजगाव येथील रहिवासी संजय गोटेकर हे मुलगा यशसोबत दुचाकी (क्रमांक एम. एच. 27 सी. एस. 1702) ने चांदूरबाजार-शिराळा मार्गे अमरावतीकडे येत होते. यावेळी रस्त्यात दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी एका पंपाकडे वळत असताना मागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. हि धडक एवढी भीषण होती कि या अपघातात यशचा जागीच मृत्यू झाला, तर संजय हे गंभीर जखमी झाले. यानंतर नागरिकांनी वलगाव पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. (Amrawati Crime News)

 

या घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
व जखमी संजय यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेथून त्यांना एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
याप्रकरणी वलगाव पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. डोळ्यासमोरच तरुण मुलाने प्राण सोडल्याने संजय गोटेकर यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी त्या ठिकाणी मोठमोठ्याने आक्रोश केला. रस्त्यातील हे काळीज पिळवटून टाकणारे दृश्य पाहून उपस्थित असलेल्या लोकांच्यासुद्धा डोळ्यांत पाणी आले. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title :- Amrawati Crime News | a 20 year old boy died in front of his father in a bike accident on chandurbazar shirala road

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime News | आरोपी दिराकडून वहिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; औरंगाबादमधील घटना

All India Public Sectors Football Tournament | अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धा; बँक ऑफ बरोडा, एअर इंडिया संघांचे एकतर्फी विजय

Pune News | दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन; ३६ जिल्ह्यांमधून २२१५ दिव्यांग खेळाडू सहभागी होणार

 

Related Posts