IMPIMP

Amruta Fadnavis Bribery Case | अमृता फडणवीस लाच प्रकरण! बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

by nagesh
Amruta Fadnavis Bribery Case | anil jaisinghani bookie arrested in gujarat by mumbai police in amruta fadnavis bribe extortion ransom case designer aniksha jaisinghani

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Amruta Fadnavis Bribery Case | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच आणि ब्लॅकमेल (Blackmail) करण्याचा प्रयत्न केल्याचा (Amruta Fadnavis Bribery Case) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याला गुजरातमध्ये अटक (Arrest) करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) ही कारवाई केली असून त्याला आज मुंबईत (Amruta Fadnavis Bribery Case) आणले जाणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिझायनर अनिक्षा जयसिंघानी (Aniksha Jayasinghani) हिला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानी याची मुलगी आहे. अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली, पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचे सांगत मदत करण्याची मागणी केली होती. (Amruta Fadnavis Bribery Case)

 

 

कोण आहे अनिल जयसिंघानी?

– उल्हासनगरमधील क्रिकेट बुकी
– 2010 मध्ये बेट घेताना पंचतारांकित हॉटेलमध्ये अटक
– ब्लू बॉय ऑफ मुंबई ओळख असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या जवळचा व्यक्ती
– जवळचा व्यक्ती मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police CP) झाल्यानंतर कमिश्नर ऑफिसमध्ये वर्दळ वाढली
– 1995 मध्ये काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर उल्हासनगर महापालिकेची निवडणूक (Ulhasnagar Municipal Election) लढवली
– 1997 मध्ये पुन्हा निवडणुक लढवली मात्र पराभव झाला
– 2002 साली राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश आणि पालिका निवडणुकीत विजयी
– 15 गुन्हे दाखल असून मागील 9 वर्षांपासून फरार

 

काय आहे प्रकरण?

अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी एफआयआर (FIR) दाखल केला. पोलिसांनी डिझायनर अनिक्षाला ताब्यात घेतले आहे. अनिक्षाने वडिलांना सोडण्यासाठी एक कोटी रुपये लाच देण्याचा तसेच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध आयपीसी 120 (बी) (षडयंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act) 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Amruta Fadnavis Bribery Case | anil jaisinghani bookie arrested in gujarat by mumbai police in amruta fadnavis bribe extortion ransom case designer aniksha jaisinghani

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | ‘तुझे देख के मुझे मेरे मरी हुई बीवी की याद आ गई’ ! 50 वर्षाच्या नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Pune Crime News | दत्तवाडीमध्ये नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Chhatrapati Sambhajinagar Crime News | शौचालयास जाऊ न दिल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान राडा; लॉज मालकाला बेदम मारहाण

 

Related Posts