IMPIMP

Amruta Khanvilkar | नवऱ्याबरोबर राहत नसलेल्या चर्चांवर अमृता खानविलकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाली….

by nagesh
Amruta Khanvilkar | amruta khanvilkar talk about rumours about her relationship with himanshu malhotra see details

सरकारसत्ता ऑनलाईन  – Amruta Khanvilkar | मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिची आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. अमृताने मराठी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयापेक्षाही जास्त तिने तिच्या नृत्याने नेहमीच प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ असो वा ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ हे गाणे.. अमृताने नेहमीच प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले आहे. सध्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अमृता व तिचा पती हिमांशू मल्होत्रा यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या बऱ्याच चर्चा सध्या रंगल्या आहेत. यावर आता अमृताने स्पष्टीकरण दिले आहे. (Amruta Khanvilkar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाली अमृता खानविलकर?

प्लॅनेट मराठीच्या पटलं तर घ्या या शोमध्ये अमृताने हजेरी लावली होती. यावेळी तिला हिमांशू व तिच्या नात्याविषयी सुरू असलेल्या अफवांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अमृता म्हणाली, “आम्ही दोघं एकमेकांना फॉलो आणि अनफॉलो करत असतो. आम्हा दोघांना एकत्र राहून 18 वर्ष झाली. याची आता मला सवय झाली आहे. आधी त्याने मला अनफॉलो केलं की आमच्यामध्ये वाद व्हायचे. आताही मी त्याच्याशी भांडते. पण हे अगदीच बालिशपणासारखं आम्ही वागतो.” असे अमृता म्हणाली आहे. कितीही अफवा असल्या तरी अमृता व हिमांशू अजूनही एकत्र आहेत हे तिने पहिल्यांदाच उघडपणे जाहीर केले आहे. (Amruta Khanvilkar)

 

 

अमृता आणि हिमांशू मल्होत्रा या दोघांनी 2015 मध्ये लग्न केलं होतं. त्या दोघांची पहिली भेट 2004 साली झाली होती. या दोघांनी ‘नच बलिये सीझन-7’ या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल होत. अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा यांच्याकडे नेहमीच क्युट कपल म्हणून पाहिले जाते. यावेळी अमृताने माझ्या पप्पांनी मला आतापर्यंत डान्स करताना बघितले नसल्याची खंतही व्यक्त केली. तसेच अमृताने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. “खूप वेळ आहे तुमच्याकडे” असे केवळ चार शब्दात उत्तर देत अमृताने ट्रोलर्सचे तोंड बंद केले आहे.

 

अमृताने आतापर्यंत गोलमाल, साडे माडे तीन, गैर, नटरंग, फक्त लढ म्हणा, सतरंगी रे, शाळा, आयना का बायना,
धूसर, झकास, अर्जुन, वेलकम जिंदगी, कट्यार काळजात घुसली, आणि डॉ काशिनाथ घाणेकर,
वेल डन बेबी,चंद्रमुखी या मराठी चित्रपटांमध्ये आजवर काम केलेले आहे. मराठीचित्रपटासोबतच अमृताने राझी,
सत्यमेव जयते आणि मलंग सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Amruta Khanvilkar | amruta khanvilkar talk about rumours about her relationship with himanshu malhotra see details

 

हे देखील वाचा :

Sanjay Dutt And Manyata Dutt | पत्नी मान्यता बरोबर रोमँटिक डान्स केल्याने संजय दत्त झाला ट्रोल

Amrawati Crime News | बाईक अपघातात बापाच्या डोळ्यादेखत 20 वर्षीय मुलाचा मृत्यू; अमरावतीमधील घटना

All India Public Sectors Football Tournament | अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धा; बँक ऑफ बरोडा, एअर इंडिया संघांचे एकतर्फी विजय

 

Related Posts