IMPIMP

Andheri By-Election | …ही तर फिक्स मॅच, डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीनेच भाजपाची माघार, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदींची राज ठाकरे यांच्यावरही टीका

by nagesh
Andheri By-Election | shivsena mp priyanka chaturvedi commented on bjp after bjp candidate murji patel withdraws from andheri east byelection

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief
Sharad Pawar) यांनी अंधेरी पोटनिवडणुक बिनविरोध (Andheri By-Election) करण्यासाठी केलेल्या आवाहनानंतर अनेक घडामोडी घडल्या
आणि आज भाजपने निवडणुकीतून (Andheri By-Election) माघार घेतल्याचे जाहीर केले. यानंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काँग्रेसने
देखील या घडामोडींवर संशय व्यक्त केला आहे. आता तर भाजपाच्या माघार घेण्यावर शिवसेना सुद्धा संशय व्यक्त करत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut), उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (MP Priyanka Chaturvedi) यांनीही भाजपाच्या माघार घेण्याच्या कृतीवर …ही फिक्स मॅच, असे म्हणत टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले की, ऋतुजा लटकेंवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना भाजपाची संवेदनशीलता कुठे होती? भाजपाला महाराष्ट्राच्या संस्कृतीची आता आठवण आली असेल, तर त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. ‘देर आये दुरुस्त आये’. खरं तर पराभवाच्या नामुष्कीतून वाचण्यासाठीच भाजपने माघार घेतली आहे. उच्च न्यायालयातील (High Court) विजयानंतर हा आमचा दुसरा विजय आहे. आगामी सर्व निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू.

 

दरम्यान, भाजपाच्या माघार घेण्याच्या निर्णयानंतर एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. निवडणूक (Andheri By-Election)
बिनविरोध करण्यासंदर्भात आवाहन करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक
वारसा दाखविला आहे. यासाठी शिवसेना सदैव पवारांची आभारी राहील, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे शिवसेना नेते हे राज ठाकरे यांच्या पत्राला भाजपाचे स्क्रीप्ट, फिक्स मॅच असे म्हणत टीका करत आहेत.

 

 

Web Title :- Andheri By-Election | shivsena mp priyanka chaturvedi commented on bjp after bjp candidate murji patel withdraws from andheri east byelection

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | बेकायदा होर्डींग्ज उभारल्यास जागा मालकाच्या प्रॉपर्टीवर दंडाचा बोजा चढविणार, आकाशचिन्ह विभाग प्रमुख माधव जगताप यांची माहिती

Maharashtra IPS Officers | प्रशिक्षण पुर्ण केलेल्या 11 आयपीएस अधिकार्‍यांच्या पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, बीड, नांदेड, जळगांव, अकोला, नागपूर ग्रामीण, भंडारा, औरंगाबाद ग्रामीण, यवतमाळ आणि धुळे येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त्या

Ambadas Danve | महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय भाजपने घेतला – अंबादास दानवे

 

Related Posts