IMPIMP

Anil Desai | ‘उद्या शिंदे गटाचे वकील मीच मुख्य नेता असल्याचे म्हणतील..,’ अनिल देसाई यांची शिंदे गटावर टीका

by nagesh
Anil Desai | thackeray group leader anil desai slams shinde group advocate ahed of election commission hearing

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Anil Desai | शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह कोणाला मिळणार? याबाबतची सुनावणी निवडणुक आयोगापुढे झाली. यावेळी सुनावणीसाठी दिल्ली येथे आले असता ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाना साधला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना अनिल देसाई म्हणाले की, शिंदे गटातील वकील मागच्या सुनावणी वेळी काही हास्यास्पद दावा करत होते. ज्यांना पक्षातून बाद केले आहे ते जर पक्षावर दावा करत असतील तर ही गोष्ट हास्यास्पद असल्याचे अनिल देसाई म्हणाले. तसेच याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘उद्या शिंदे गटाचे वकील मीच मुख्य नेता असल्याचे म्हणतील. पण त्यांच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. निवडणूक आयोग नियमानुसार काम करते, ते योग्य निकाल घेतील.’ असेही यावेळी बोलताना अनिल देसाई म्हणाले.

 

त्यापुढे बोलताना अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले की, ‘न्याय देणे निवडणूक आयोगाच्या हातात आहे, त्याच्या प्रतिक्षेत आम्ही आहोत. पण हे करत असताना सर्व बाजू पडताळून पाहणं, दस्ताऐवज पाहणं, काय खरं – काय खोटं तपासलं गेलं पाहीजे. निवडणूक आयोग याची छाननी करेल, अशी आम्हाला खात्री वाटते. आजच्या सुनावणीदरम्यान वकील बाजू मांडतील. तसेच मागच्या वेळी त्यांच्या वकीलांनी जे मुद्दे मांडले, तेही आम्ही खोडून काढू. सर्वांनीच मागच्या वेळी पाहिलं की, त्यांच्या मुद्द्यांमध्ये तथ्य नव्हते. ज्याला कायद्याचे ज्ञान आहे किंवा ज्याला समज आहे त्याला देखील समजून येईल की, त्यांच्या मुद्द्यात दांभिकता होती.’

 

तसेच यावेळी बोलताना अनिल देसाई म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ लवकरच संपत असून त्याबाबत निवडणूक घेण्याची अथवा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविण्याविषयीची मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे देखील ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संपुर्ण गटाच्या अपात्रतेविषयीची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे.
त्याचा निर्णय लागेपर्यंत निवडणुक आयोगाने सुनावणी घेऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे.
असे देखील अनिल देसाई यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगाचा निकाल जर आमच्या विरोधात गेला तरीही
आमच्या समोर सुप्रीम कोर्टाचा पर्याय आहे. तरीही विषय त्याच ठिकाणी सोडवले जावेत. अशी आमची धारणा आहे.
असे देखील यावेळी बोलताना अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले.

 

Web Title :-  Anil Desai | thackeray group leader anil desai slams shinde group advocate ahed of election commission hearing

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | काँग्रेस नेत्याकडून नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना लिहिले पत्र

Chitra Wagh | संजय राऊतांच्या ‘त्या’ टिकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या- ‘कार्यकारी संपादक जेव्हापासून बाहेर आले, तेव्हापासून…’

Devendra Fadanvis | बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी खेळी; पंकजा मुंडे यांना डावलून ‘या’ नेत्याशी सलगी

 

Related Posts