IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 25 हजार रोख आणि पोलीस चौकीसाठी प्रिंटरची लाच मागणाऱ्या 2 पोलिसांवर FIR; पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनकौटुंबिक हिंसाचाराच्या (Domestic Violence) गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी 50 हजार
रुपयाची लाचेची मागणी (Demand Bribe) करुन तडजोडीत 40 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करणाऱ्या दोन पोलिसांवर (Pune Rural Police)
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपींनी 25 हजार रुपये रोख
(Cash) आणि पोलीस चौकीसाठी (Police Chowki) प्रिंटर अशी लाच मागितल्याचे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau
(ACB) Pune) केलेल्या पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात (Wadgaon Nimbalkar Police Station)
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलीस हवालदार शिवाजी सातव Police Constable Shivaji Satav (वय – 52) आणि पोलीस नाईक गोपाळ जाधव Police Naik Gopal Jadhav (वय – 35) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी 67 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) 24 डिसेंबर 2021 रोजी तक्रार केली होती. पथकाने पडताळणी केली असता सातव आणि जाधव यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारदार व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध पुणे ग्रामीण पोलीस दलातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी दोघांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाच मागितली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

 

पुणे एसीबीने (Pune ACB) पडताळणी केली असता तक्रारदार व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक गोपाळ जाधव याच्याकडे आहे.
या गुन्ह्यात अटक न करता मदत करण्यासाठी सातव आणि जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये रोख व पोलीस चौकीकरीता प्रिंटरसाठी (Printer) 15 हजार रुपये असे एकूण 40 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
शिवाजी सातव आणि गोपाळ जाधव यांच्या विरुद्ध शुक्रवारी (दि.24) लाचलुचपत प्रतिबंधक कायाद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe), आणि त्यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | FIR against 2 policemen for demanding Rs 25000 cash and printer bribe for police chowki Excitement in Pune Rural Police Force

 

हे देखील वाचा :

Urfi Javed Hot Viral Video | सेक्सी बिकिनी घालून स्विमिंग पूल मधून बाहेर आली उर्फी जावेद, कॅमेरा पाहताच सुरू केला डान्स..!

HSC Exam | बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल, एक महिन्याने होणार ‘हे’ दोन पेपर!

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 446 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aam Aadmi Party (AAP) Pune | विसर पडलेल्या हक्कांची जाणीव ‘आप’ने करुन दिली – विजय कुंभार

 

Related Posts