IMPIMP

HSC Exam | बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात मोठा बदल, एक महिन्याने होणार ‘हे’ दोन पेपर!

by nagesh
Scholarship Examination in Maharashtra | mahahrashtra scholarship examination for 5th and 8th standard students will be held in month of june 2022 examination 2022

सरकारसत्ता ऑनलाइन – (HSC Exam) बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, आता कुठे परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन (Offline) हा वाद मिटला आहे. मात्र अशातच महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12 वी (HSC Exam) परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राज्यात येत्या 4 मार्चपासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेच्या वेळेत झाला बदल झाला आहे तो म्हणजे 5 मार्च आणि 7 मार्च रोजी होणारा पेपर एक महिन्यांनी पुढे ढकलण्यात आला आहे. 5 मार्चला बारावीचा सकाळच्या सत्रात हिंदी आणि दुपारच्या सत्रामध्ये जर्मन, जपानी, चिनी आणि पर्शिअन या विषयाचे पेपर होणार होते. तर 7 मार्चला सकाळच्या सत्रात मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तमिळ, पंजाबी, बंगाली आणि दुपारच्या सत्रात फ्रेंच, अर्धामागधी, स्पॅनिश आणि पाली विषयाचा पेपर (Paper) होणार होता.

 

बोर्डाचे पेपर (HSC Exam) लांबवण्याचं कारण म्हणजे, पुणे- नगर महामार्गावरून येणाऱ्या ट्रकला आग लागली होती.
त्या ट्रकमध्ये बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जळल्या गेल्या होत्या. त्या प्रश्नपत्रिका या विषयांच्या असल्याचं बोललं जात आहे.
म्हणूनच हे पेपर लांबवले गेल्याची माहिती समजत आहे.

 

दरम्यान, बोर्डाच्या पेपर हे ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
राज्यभर विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं होतं.
त्यावेळी विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी विकास हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकला अटक करण्यात आली होती.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- HSC Exam | hsc exam 2022 schedule change 5 and 7 march papers postpone decision taken

 

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 446 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aam Aadmi Party (AAP) Pune | विसर पडलेल्या हक्कांची जाणीव ‘आप’ने करुन दिली – विजय कुंभार

Yami Gautam Oops Moment | यामी गौतमनं घातले अनोखे आउटफिट, उघड्या जॅकेटमुळं झाली Oops Moment ची शिकार..

 

Related Posts