IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Sangli | वेतनश्रेणीच्या मान्यतेसाठी मागितले दीड लाख; शिक्षणाधिकाऱ्यासह अधिक्षकाला रंगेहाथ पकडले

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Sangli | पदवीधर वेतनश्रेणी मान्यता करून देण्यासाठी तीन शिक्षकांकडून 1 लाख 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यासह अधीक्षकांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Sangli) रंगेहाथ पकडले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली असून माध्यमिक शिक्षण अधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (Vishnu Marutirao Kamble) (वय 58, रा. विश्रामबाग सांगली) व अधीक्षक विजयकुमार अशोक सोनवणे (Vijaykumar Ashok Sonawane) (वय 41, रा. अहिल्यानगर कुपवाड) अशी अटक (Arrested) करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पदवीधर वेतनश्रेणी मान्यतेबाबतचे काम तक्रारदारासह त्याच्या दोन शिक्षक मित्राचे माध्यमिक शिक्षण विभागाकडे होते. हे काम करण्यासाठी या तिन्ही शिक्षकांकडे शिक्षणाधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी प्रत्येकी 60 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे 24 एप्रिलला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार अर्ज दाखल केला. या तक्रारींची पडताळणी करत असताना दोघांनी 1 लाख 70 हजार घेण्याचे ठरवले. पैसे दिल्यानंतर वेतनश्रेणी मान्यता करण्याचा निर्णय झाला.

 

दरम्यान, शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Sangli) सापळा रचला.
अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार कडून रक्कम स्वीकारली.
त्यानंतर शिक्षणाधिकारी कांबळे यांच्या घरी जाऊन ती रक्कम त्यांना देण्यात आली. त्याचवेळी पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले. विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Sangli | sangli education officer and superintendent arrested while accepting bribe of rs 1 lakh 70 thousand

 

हे देखील वाचा :

Nagpur Umred Road Accident | ओव्हरटेक करताना भरधाव कारची ट्रकला धडक; 7 जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel New Rates | पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी; प्रमुख शहरांतील आजचा दर किती?, जाणून घ्या

Gold Silver Price Today | आजचे सोन्या-चांदीचे दर काय ?; जाणून घ्या

LPG Gas Cylinder Price Hike | महागाईचा भडका ! सर्वसामान्यांना पुन्हा एकदा झटका; घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा 50 रुपयांनी वाढ

 

Related Posts