IMPIMP

Pune Corporation | पुणे मनपा निवडणूक ! प्रभाग रचनेसाठी ‘वेटींग’ करणार्‍या काही नगरसेवकांनी ‘विकास कामांच्या’ वर्क ऑर्डर ठेवल्या ‘होल्ड’वर

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन महापालिका निवडणुक (Pune Corporation) जवळ आली असली तरी अद्याप प्रभाग रचना जाहीर (PMC Elections) होण्यास काही आठवड्यांचा कालावधी असल्याने नगरसेवकांमध्ये (Standing Corporator) चलबिचल सुरू आहे. एवढेच नव्हे तर अनेकांनी विकासकामांचे अगदी वर्क ऑर्डरपर्यंत नियोजन केले आहे. मात्र प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच संधी मिळेल त्याच भागात कामे करण्यासाठी या वर्क ऑर्डर ‘होल्ड’वर (Work Orders On Hold) ठेवल्याची माहिती (Pune Corporation) अधिकारी सूत्रांनी दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

महापालिकेची निवडणूक अगदी अडीच ते तीन महिन्यांवर येउन ठेपली आहे. मागील दीड वर्ष कोरोनामुळे आर्थिक आणीबाणीची राहीली. उत्पन्न आणि
खर्चाचा ताळमेळ राहावा यासाठी अत्यावश्यक विकासकामांना आणि खर्चाला प्राधान्य देत महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner
vikram kumar) यांनी वित्तीय समितीच्या माध्यमातून कामांना व योजनांना मान्यता देण्याचे अधिकार स्वत:कडे ठेवले. यामुळे नगरसेवक आणि प्रशासन अर्थात प्रामुख्याने महापालिका आयुक्त असा कलगीतुरा मागील काही काळ रंगला आहे. यावरून अगदी सत्ताधार्‍यांनीही महापालिका (Pune Corporation) आयुक्तांवर वेळोवेळी आगपाखड केली आहे. एवढेच नव्हे तर स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि महापौरांनीही वेळोवेळी विकास कामांना कात्री न लावता अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करावी, असे आदेशही दिले.

 

अखेर विसंवाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूने एक पाउल मागे येत नगरसेवकांच्या स यादीतील ३० टक्के कामांना परवानगी दिली. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवत निविदा काढल्या गेल्या, त्या मंजूरही करण्यात आल्याअसून त्याच्या वर्क ऑर्डरही काढण्यात आल्या आहेत. अशातच पुढील तीन आठवड्यात निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर होणार असल्याने कामांसाठी आग्रह धरणार्‍या काही माननीयांनी कामांच्या वर्क ऑर्डर होल्डवर ठेवल्या आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षणात संधी मिळाल्यास नव्याने निर्माण होणार्‍या प्रभागांमध्ये विकासकामे करण्यासाठी या वर्क ऑर्डर होल्डवर ठेवल्याचे काही नगरसेवक सांगत आहेत. जेणेकरून ज्या नवीन प्रभागात संधी मिळेल तिथे शेवटच्या टप्प्यात विकास कामांचा आणि भुमिपूजनांचा धुराळा उडवून मतदारांना आकर्षित करणे सोपे जाणार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

काही नगरसेवकांनी हा विचार केला असला तरी वर्क ऑर्डरनुसार ठरलेल्या ठिकाणीच विकासकामे करावी लागणार आहेत. कामाची जागा बदल करायची झाल्यास त्यासाठी पुन्हा परवानगी घ्यावी लागणार आहे. आर्थिकस्थिती विचारात घेता नगरसेवकांच्या या ‘ट्रीक’ला शिस्तिचा बडगा उगारलेले महापालिका (Pune Corporation) आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) हे प्रतिसाद देणार? हा खरा प्रश्‍न आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Election! Some councilors, who were waiting for the formation of wards, put work orders of ‘development works’ on hold-pmc commissioner vikram kumar

 

हे देखील वाचा :

PM JanDhan Account | ‘या’ पध्दतीनं उघडा पीएम जनधन अकाऊंट, सरकार करते 1.3 लाख रुपयांची मदत; जाणून घ्या

Railway Recruitment 2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत GDMO पदांसाठी भरती; पगार 95 हजार रुपये

Sharad Pawar | शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘…तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढू’

 

Related Posts