IMPIMP

Appasaheb Dharmadhikari | उष्माघाताने श्री सेवकांचा झालेला मृत्यू माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक, याचे राजकारण होऊ नये – आप्पासाहेब धर्माधिकारी

by nagesh
Appasaheb Dharmadhikari | The death of Shri Sevak due to heatstroke is very painful for me, this should not be politicized - Appasaheb Dharmadhikari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन-  ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनी श्री सेवकांच्या उष्माघाताने
झालेल्या मृत्यू (Kharghar Shree Sevak Death Case) बद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र भूषण सोहळा (Maharashtra Bhushan Award)
लाखो श्री सेवकांच्या उपस्थितीत रविवारी पार पडला होता. त्यावेळी उष्माघाताने (Heat Stroke) 13 श्री सेवकांचा मृत्यू झाल्याने पुरस्कार सोहळ्याला
गालबोट लागलं. त्यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. श्री सेवकांचा मृत्यू क्लेशदायक आहे. या घटनेवर कोणीही
राजकारण करु नये असे आवाहन आपासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनी केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे निवेदन

 

आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनी उष्माघाताने श्री सेवकांचा मृत्यू झाल्यानंतर एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सर्व श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे.

 

आपल्याच कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी म्हटले आहे. झालेला प्रकार दुर्दैवीच आहे. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण (Politics) होऊ नये. अशी आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

दोन दिवसांचा दुखवटा

 

उष्माघाताने 13 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दुखवटा पाळला आहे. पुढील दोन दिवस ते भक्तांना भेटणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पुरस्कार सोहळ्यानिमित्त रांगोळी,  फुलांची सजावट करण्यात आली होती. परंतु, या दुर्दैवी घटनेनंतर फुलांची सजावट आणि रांगळी काढण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Appasaheb Dharmadhikari | The death of Shri Sevak due to heatstroke is very painful for me, this should not be politicized – Appasaheb Dharmadhikari

 

हे देखील वाचा :

Bombay High Court | मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका तर शिंदे सरकारला दिलासा; BMC मध्ये 227 वॉर्ड राहणार

Black-Yellow Taxis Fares Hike In Pune | पुणे जिल्ह्यातील काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या भाडेदरात वाढ, जाणून घ्या सविस्तर

TDM Marathi Movie Trailer | ‘एकदम कडक ट्रेलर, टीडीएम सुपरहिट होणार…’, टीडीएमच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून मिळतोय प्रतिसाद

Pune Crime News | पुणे-फातिमानगर क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – मसाज पार्लरच्या नावाखाली भलताच उद्योग, 5 महिलांची सुटका

 

Related Posts